Sanjay Manjrekar Support : “हे फक्त नीट पुरतं मर्यादित नाही…”, संजय मांजरेकरांची आक्रमक पोस्ट; म्हणाले, “दोन मुलांचा बाप म्हणून…”
Sanjay Manjrekar Support : आता माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ थेट मैदानात उतरत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Sanjay Manjrekar Support NEET Exam Protest Share Post on X : वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) मधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि लाखो विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचे लोण आता संपूर्ण देशभरात पसरले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या लाठीमाराचा सामना करावा लागल्यानंतर, आता क्रीडा विश्वातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सचिन तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्यानंतर आता माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ थेट मैदानात उतरत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
“तरुणांना दाबू नका, हे लोकशाहीविरोधात उठलेले वादळ!” –
संजय मांजरेकर यांनी ‘एक्स’वर (X) पोस्ट करत लिहिले, “मी भारतातील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यांना दाबू नका, त्यांना आकाशात गगनभरारी घेऊ द्या. हेच तरुण भारताला नव्या उंचीवर नेतील.”
I stand in solidarity with the youth of India. Do not suppress them, give them wings. They will take India to new heights.#DelhiProtest
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) July 23, 2026
पुढे बोलताना ते म्हणाले, “हा लढा केवळ नीट पेपरफुटीपुरता मर्यादित नसून, लोकशाहीत होणाऱ्या दडपशाही आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांकडून (Mainstream Media) होणाऱ्या ‘ब्रेनवॉशिंग’विरोधात उठलेला आवाज आहे. दोन मुलांचा बाप म्हणून मला चांगला अनुभव आहे; आजच्या तरुण पिढीला दाबण्याचे प्रयोग कधीही यशस्वी होणार नाहीत.”
This isn’t just about NEET paper leaks. It’s a revolt against feeling generally suppressed in a democracy & the mainstream media’s brainwashing.
As a father of two, I know first hand : suppressing & brainwashing today’s youth will never work.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) July 24, 2026
सचिन अन् शुबमन गिलचे भावूक आवाहन –
याआधी सचिन तेंडुलकरने आपल्या प्राध्यापक वडिलांच्या “अपयश चालेल, पण फसवणूक करु नको” या शिकवणीचा उल्लेख करत गुणवत्तेचा (Merit) विजय होणारी पारदर्शक व्यवस्था उभारण्याची मागणी केली होती.
तर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाबद्दल मला आदर आहे. शिक्षणातच देशाचे भविष्य घडवण्याची ताकद आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते.





