Gambhir Pradhan Memes : “आधी राजीनामा कोण देणार?”; धर्मेंद्र प्रधान आणि गौतम गंभीर यांच्यावर भन्नाट मीम्स; ‘एक्स’वर उडाली खळबळ
Gambhir Pradhan Memes : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरआणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नावे एकाच वेळी ट्रेंड होत आहेत

Gautam Gambhir Dharmendra Pradhan Resignation Trend X Memes : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांची नावे एकाच वेळी ट्रेंड होत आहेत. क्रीडा आणि शिक्षण ही दोन पूर्णपणे वेगळी क्षेत्रे असली, तरी नेटीझन्स आणि मीम मेकर्सनी (Meme Makers) दोघांवर उपरोधिक टीका करत त्यांना एकाच धाग्यात गुंफले आहे.
विद्यार्थ्यांचा भडका अन् ‘गंभीर’ फँसची नाराजी!
एकडे नीट (NEET) परीक्षा गैरप्रकार, पेपरफुटी आणि प्रशासकीय त्रुटींवरून जंतर-मंतरवर विद्यार्थी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
🚨 BREAKING NEWS 🚨
🚨 CJP PROTESTERS CHANT SLOGANS DEMANDING THE RESIGNATIONS OF GAMBHIR AND AJIT AGARKAR 🚨
During the ongoing CJP protests, some demonstrators were also seen raising slogans against Gautam Gambhir and Ajit Agarkar, in addition to demanding the resignation of… pic.twitter.com/keeMK9GkWx
— Sports Club (@sportsxclub) July 24, 2026
दुसरीकडे, भारतीय संघाच्या अलिकडच्या काही दौऱ्यांमधील लाजिरवाण्या कामगिरीमुळे आणि वादग्रस्त निर्णयांवरून क्रिकेट चाहते मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यावर प्रचंड संतापले आहेत.
— Sarkari Umpire (@SarkariUmpire) July 24, 2026
‘शिक्षण अन् क्रिकेट दोन्ही उद्ध्वस्त!’; मीम्सचा महापूर
In bhai sab ko resign karvane k liye kaha protest Krna hoga 👀🙆🏻♂️
– Gautam Gambhir is the Dharmendra Pradhan of team India 🤬 pic.twitter.com/qSnf026VSV
— CineSports (@SportsCraft381) July 24, 2026
Cricket fans also joined the protest😭🔥
Journalist asked a Rohit Sharma fan🎙️; Dharmendra Pradhan se phle kiska resignation chaiye?
He replied : Gautam Gambhir ka🤣🔥 pic.twitter.com/QbdhQRgmPg
— Gillfied⁷ (@Gill_Iss) July 24, 2026
सोशल मीडिया युजर्सनी देशातील दोन महत्त्वाच्या घटकांना – विद्यार्थ्यांचे भवितव्य (शिक्षण) आणि चाहत्यांची आवड (क्रिकेट) यांना एकत्र जोडले आहे. “धर्मेंद्र प्रधान यांच्या आधी गौतम गंभीर यांनी राजीनामा दिला पाहिजे,” अशा आशयाचे मीम्स सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
देशातील या दोन मोठ्या मुद्द्यांवर उपरोधिक टीका करत मीम मेकर्स विचारत आहेत की, “विद्यार्थ्यांचा रोष की क्रिकेट चाहत्यांचा संताप… आधी राजीनामा नक्की कोण देणार?” सोशल मीडियावरील हा अनोखा ट्रेंड सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.





