Ricardo Gordon Arrested for stolen car : वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळलेल्या आणि इयान बेल तसेच जोनाथन ट्रॉटसारख्या इंग्लंडच्या दिग्गजांसोबत खेळलेल्या माजी वेगवान गोलंदाज रेकॉर्डो गॉर्डन याला चोरीची कार आणि त्यामध्ये धारदार शस्त्र मिळाल्याने अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी बर्मिंगहॅममधील एरडिंगटन परिसरात नियमित गस्त घालत असताना गॉर्डनला ताब्यात घेतले. चोरीची कार आणि धारदार शस्त्रासह अटक – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन स्कायब्रिज’ अंतर्गत अधिकारी एरडिंगटनच्या सटन रोड परिसरात गस्त घालत होते. तेव्हा त्यांना एक कार संशयास्पद वाटली. पोलिसांनी ती कार थांबवून झडती घेतली असता, कारमध्ये दरांती हे धारदार शस्त्र आढळले. या प्रकरणी ३४ वर्षीय रेकॉर्डो गॉर्डनला त्वरित अटक करण्यात आली. गॉर्डनवर मोटार वाहन चोरी आणि धारदार शस्त्र बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याला पुढील महिन्यात बर्मिंगहॅम मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘ऑपरेशन स्कायब्रिज’ अंतर्गत अधिकारी शहरात सक्रियपणे काम करत आहेत, ज्यामुळे गुन्हेगारांना लक्ष्य करणे आणि गुन्हे रोखणे शक्य झाले आहे. हेही वाचा – IND A vs BAN A : १९४ धावांचा थरार बरोबरीत सुटला! पण सुपर ओव्हरमध्ये भारताचा घात; बांगलादेशचा रोमहर्षक विजय! रेकॉर्डो गॉर्डनची क्रिकेट कारकीर्द – जमैकामध्ये जन्मलेला रेकॉर्डो गॉर्डन सात वर्षांचा असताना कुटुंबासह यूकेमध्ये आला होता. त्याने स्थानिक लीगमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून चांगली छाप पाडली होती. त्याने वयाच्या १५ व्या वर्षीच वॉरविकशायरने त्याला भविष्यातील स्टार मानले होते. तो २०११ मध्ये वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबशी जोडला गेला. २०१३ मध्ये त्याने बर्मिंगहॅम बिअर्ससाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, २०१६ च्या अखेरीस त्याला संघातून वगळण्यात आले.