Handshake Controversy : ऋतुराजने पुढे केला हात अन् हार्दिकने फिरवली पाठ… CSK vs MI सामन्यानंतरचा ‘तो’ वादग्रस्त क्षण चर्चेत! पाहा VIDEO
Handshake Controversy : या सामन्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पंड्याच्या हस्तांदोलन वादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Hardik Pandya Ruturaj Gaikwad Handshake Controversy : शनिवारी चेपॉक स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. चालू हंगामात चेन्नईने मुंबईचा दोन वेळा पराभव केला असून, या पराभवामुळे मुंबईच्या प्लेऑफमधील आशांना मोठा धक्का बसला आहे. या सामन्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पंड्याच्या हस्तांदोलन वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्यातील कथित ‘हँडशेक’ (हस्तांदोलन) न करण्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ऋतुराज गायकवाड हँडशेकसाठी हात पुढे करत असताना, हार्दिक पंड्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेल्याचे दिसत आहे. यावरून चाहत्यांनी हार्दिकवर ‘अहंकारी’ आणि ‘अनादर करणारी वृत्ती’ अशी टीका करत, त्याची खेळाडूवृत्ती कुठे गेली, असा सवाल उपस्थित केला.
Just look at the arrogance of Hardik Pandya. After the match yesterday, he walked off without even shaking hands with Ruturaj Gaikwad, and look at his attitude while passing by.
Basic values seem missing, forget sportsmanship. It’s pure disrespect and totally unacceptable. pic.twitter.com/bA7lzKayT6— PitchTalks (@ThePitchTalks) May 3, 2026
हार्दिक पंड्यावर होतेय टीका –
या व्हायरल व्हिडिओमध्ये ऋतुराज गायकवाड सर्व प्रथम रघु शर्माशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. त्यानंतर हार्दिक पंड्या समोर येताना दिसत आहे. यावेळी ऋतुराज त्याच्याशी हस्तांदोनल करण्यासाठी हात पुढे करतो. मात्र, हार्दिक पंड्या त्याच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे निघून जाताना दिसत आहे. ज्यामुळे चाहते हार्दिकवर सडकून टीका करत आहे. तसेच हार्दिकच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
चेन्नईने मुंबईला दुसऱ्यांदा चारली धूळ –
सामन्याच्या स्थितीबद्दल बोलायचे तर, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. ९० धावांत २ गडी बाद अशी मुंबईची मजबूत स्थिती होती, पण १० षटकांच्या आत चेन्नईच्या गोलंदाजांनी सामन्याचे चित्र पालटले. मुंबईचा संघ अवघ्या १५९ धावा करू शकला. प्रत्युत्तरात, ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्मा यांच्या शानदार ९८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईने १८.१ षटकांत हे लक्ष्य सहज पार केले. या पराभवामुळे मुंबईच्या आगामी सामन्यांमधील आव्हान अधिकच खडतर झाले आहे.





