CSK vs MI : सीएसकेचा पुन्हा एकदा डंका! मुंबईचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवत दुसऱ्यांदा चारली धूळ, ऋतुराज-कार्तिक चमकले
CSK vs MI : सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद ६७ धावांची खेळी साकारत या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

CSK vs MI Chennai Super Kings beat Mumbai Indians : आयपीएल २०२६ च्या ४४ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स ने आपल्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला आहे. वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवल्यानंतर, आता चेपॉक येथील होम ग्राऊंडवरही चेन्नईने मुंबईला सहज पराभूत केले आहे. या विजयासह चेन्नईने या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवला.
मुंबई इंडियन्सची खराब फलंदाजी –
शनिवारी (२ मे) झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईचे फलंदाज या संधीचा फायदा घेण्यात अपयशी ठरले. मुंबईचा संघ २० षटकांत केवळ ७ गडी गमावून १५९ धावा करू शकला. नमन धीरने सर्वाधिक ५७ धावांची तर रायन रिकल्टनने ३७ धावांची खेळी केली.
An unorthodox finishing touch to a classic rivalry! 🎬
🎥 @ChennaiIPL complete the double over their arch-rivals #MI in style 💛
Scorecard ▶️ https://t.co/VVAjldiiC0#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/yeBWsXZ6Lu
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2026
मात्र, कर्णधार हार्दिक पंड्याला २४ चेंडूंत केवळ १८ धावा करता आल्या. चेन्नईकडून गोलंदाजीत अंशुल कम्बोजने ३२ धावांत ३ विकेट्स घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. नूर अहमदने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या, तर जेमी ओवर्टनने १ विकेट्स घेतली.
गायकवाड आणि कार्तिकची दमदार भागीदारी –
Shouldered the Responsibility ⭐️
For his commanding match-winning knock, Captain Ruturaj Gaikwad bags the Player of the Match award 👏👏
Relive his knock ▶️ https://t.co/oWRuXOqO39 #TATAIPL | #KhelBindaas | #CSKvMI | @ChennaiIPL | @Ruutu1331 pic.twitter.com/Zb3mM8kVob
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2026
प्रत्युत्तरात १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात सावध झाली. जसप्रीत बुमराहने संजू सॅमसनला लवकर बाद केले. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने संयमी खेळी करत मोर्चा सांभाळला. त्याने उर्विल पटेलच्या (२४) साथीने डावाला आकार दिला. यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या युवा कार्तिक शर्माने कर्णधाराला सुरेख साथ दिली.
ऋतुराज गायकवाडने ६७ धावांची नाबाद खेळी करत सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तर, युवा कार्तिक शर्माने ५४ धावांची नाबाद खेळी करत आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. या दोघांच्या नाबाद ९८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईने १८.१ षटकांतच लक्ष्य गाठले. या पराभवामुळे मुंबईची प्लेऑफ्समध्ये पोहोचण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे .





