IPL 2025 Playoff : आजचे सामने स्पष्ट करणार प्लेऑफचे चित्र, मुंबई-दिल्लीचं वाढलं टेन्शन! कसा आहे समीकरण?

IPL 2025 Playoff Scenarios for Six Teams : आयपीएल २०२५ चा उत्साह शिगेला पोहोचला आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शर्यत आता अतिशय रंजक वळणावर पोहोचली आहे. ५८ सामन्यांनंतर, आतापर्यंत चार संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. ज्यामध्ये सीएसके, आरआर, एसआरएच आणि केकेआर यांचा समावेश आहे. हे संघ बाहेर पडल्यानंतर, सहा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत शिल्लक आहेत. कोणत्या परिस्थितीत कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो, ते जाणून घेऊया.
रविवारी लीगमध्ये दोन सामने खेळले जाणार आहेत, ज्यामध्ये पहिल्या सामन्यात राजस्थान पंजाबशी भिडेल, तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्सशी भिडेल. जर राजस्थानने पहिल्या सामन्यात पंजाबला हरवले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्याचा फायदा होईल आणि ते प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. दुसऱ्या सामन्यात जर गुजरातने दिल्लीला हरवले, तर गुजरातसोबतच आरसीबी देखील प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल.
पंजाब आणि गुजरात जिंकले तर काय होणार?
🚨 THE QUALIFICATION SCENARIO. 🚨
If RR beat PBKS – RCB will qualify.
If GT beat DC – RCB and GT qualify.
If PBKS & GT win – PBKS, RCB, GT qualify.
If PBKS & DC win – No one qualifies.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 18, 2025
जर श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांच्या संघांनी रविवारी विजय मिळवला तर पंजाब, गुजरात आणि आरसीबी हे संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. दुसरीकडे, जर पंजाब आणि दिल्लीने सामना जिंकला, तर स्पर्धा आणखी खुली होईल, जिथे सर्व संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी थोडी जास्त वाट पहावी लागेल.
हेही वाचा – Harbhajan Singh : धोनीचे खरे चाहते, कोहलीचे बनावट? हरभजनच्या वक्तव्याने खळबळ! VIDEO व्हायरल
मुंबई-दिल्लीचं वाढणार टेन्शन –
आजच्या सामन्यांनंतर जर तीन संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला, तर दोन संघांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांना प्लेऑफची संधी आहे. जर गुजरात, आरसीबी आणि पंजाब हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले, तर चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात तीव्र स्पर्धा रंगेल.





