Harbhajan Singh : धोनीचे खरे चाहते, कोहलीचे बनावट? हरभजनच्या वक्तव्याने खळबळ! VIDEO व्हायरल

Harbhajan Singh’s Controversial Remark on Kohli and Dhoni Fans : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून विराट कोहली चर्चेत आहे. त्यांच्याबद्दल सतत काही ना काही बातम्या येत असतात, किंवा त्यांच्या निवृत्तीबद्दल माजी खेळाडूंची विधान येत असतात. पण, यावेळी माजी भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगचे विधान समोर आले आहे, जे आश्चर्यकारक आहे. खरंतर, हरभजन सिंग त्याच्या स्पष्टवक्त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
हरभजन सिंगचे विधान चर्चेत –
आता हरभजनने विराट कोहलीचे नाव न घेता असे काही म्हटले आहे, ज्यामुळे त्याचे चाहते संतापले आहेत. एवढेच नाही तर यावेळी त्यांनी एमएस धोनीचाही उल्लेख केला. त्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे. शनिवारी आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यादरम्यान हरभजन सिंगची ही टिप्पणी आली. कॉमेंट्री बॉक्समध्ये धोनीच्या आयपीएल भविष्याची चर्चा सुरू होती. यावर बोलताना हरभजन म्हणाला की धोनी त्याला हवे तितके दिवस खेळू शकतो.
काय होतं हरभजन सिंगचं वक्तव्य?
🚨Harbhajan Singh: “Only Dhoni has real fans, others rely on social media bots.” 😭
That’s a massive dig – Kohli fans in shambles! 😤
The GOAT debate just got spicier! 🍿#MSDhoni #ViratKohli #chinnaswamystadium #Chokli #RCBvsKKR pic.twitter.com/8sRGvlmfwi— IndiaPulse: News & Trends (@IndiaPulseNow) May 17, 2025
यानंतर, चाहत्यांबद्दलची चर्चा सुरू होते. यावर तो म्हणाला की, ‘धोनी हा एकमेव असा आहे ,ज्याचा खरा चाहता वर्ग आहे. बाकीच्यांनी चाहत्यांना आणि पीआरला पैसे दिले आहेत.’ भज्जी इथेच थांबला नाही, तर असेही म्हणाला की येथील बहुतेक खेळाडूंनी चाहत्यांना पैसे दिले आहेत. यानंतर तो म्हणाला आता ते जाऊ द्या. जर मी बोलायला सुरुवात केली तर संभाषण दुसऱ्या दिशेने जाईल. मात्र, यावेळी त्याने विराट कोहलीचे नाव घेतले नाही.
हेही वाचा – RCB vs KKR : स्टेडियममध्ये ‘हे’ गाणं वाजताच संतापला विराट; लगेच करायला लावलं बंद, काय होतं कारण?
त्याच वेळी, भज्जीच्या या विधानाने आकाश चोप्रा देखील आश्चर्यचकित झाला. हरभजनचे म्हणणे ऐकून तो म्हणू लागला की तू इतके खरे बोलायला नको होते. हरभजनच्या या विधानावर सोशल मीडियावर लोक संतापले. चाहत्यांनी असेही म्हटले की हरभजनने अप्रत्यक्षपणे कोहलीला लक्ष्य केले आहे. तेव्हापासून विराट कोहलीचे चाहते हरभजन सिंगला धडा शिकवत आहेत.





