CSK vs DC : MS Dhoni आज निवृती घेणार? आई-वडील पहिल्यादांच स्टेडियमध्ये सामना पाहायला आल्याने चर्चेला उधाण

CSK vs DC MS Dhoni parents Presence Match Spark Retirement Rumours : आयपीएल २०२५ मधील १७वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमोर १८४ दिवसांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान आयपीएल २०२५ सामन्यानंतर एमएस धोनी निवृत्तीची घोषणा करेल का? ४३ वर्षीय धोनीच्या निवृत्तीबाबत पुन्हा एकदा अटकळींनी जोर धरला आहे. धोनीचे पालक पहिल्यांदाच चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी पोहोचले आहेत, त्यामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.
धोनीचे पालक सामन्याला उपस्थित –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, धोनी गेल्या ५ वर्षांपासून फक्त आयपीएल खेळत आहे. पण या काळात, तो आयपीएलमधूनही निवृत्त होणार आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. गेल्या दोन हंगामात हे प्रश्न अधिक तीव्र झाले आहेत. विशेषतः आयपीएल २०२३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन झाल्यानंतर, धोनी निवृत्त होऊ शकतो असे मानले जात होते. पण चेन्नईच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी, धोनीने पुनरागमन केले आणि गेल्या हंगामातही खेळला. पण या काळातही त्याचे पालक एकदाही त्याला स्टेडियममध्ये पाहायला आले नाहीत.
MS DHONI's FAMILY ❤️🥹 pic.twitter.com/S5dbusRXpK
— Johns. (@CricCrazyJohns) April 5, 2025
एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग –
पण आयपीएल २०२५ च्या चौथ्या सामन्यात, धोनीचे पालक अचानक चेन्नई सुपर किंग्जचा सामना पाहण्यासाठी आल्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये खळबळ आणि अस्वस्थता वाढली आहे की धोनी निवृत्त होणार आहे का? ५ एप्रिल रोजी चेपॉक स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी, शो दरम्यान, जिओ-हॉटस्टारच्या अँकरने धोनीचे पालक सामना पाहण्यासाठी आल्याचे सांगितले. यानंतर लगेचच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही वेळाने त्यांना टीव्ही स्क्रीनवर पाहिल्यानंतर, धोनीचे चाहते अधिकच घाबरले की कदाचित ते क्रिकेटच्या मैदानावर शेवटचेच त्यांच्या थालाला पाहत आहेत का?
हेही वाचा – LSG vs MI : लखनौच्या ऋषभ आणि दिग्वेशला BCCI चा दणका! ‘या’ कृतीसाठी केली दंडात्मक कारवाई, जाणून घ्या कारण
२० वर्षात कधीही स्टेडियमध्ये येऊन सामना पाहिला नाही –
धोनीने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतरच तो त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे क्रिकेट जगतात सुपरस्टार बनला. त्यानंतर २००७ मध्ये, पहिल्यांदा कर्णधार झाल्यानंतर, त्याने भारतीय संघाला थेट टी-२० विश्वचषक जिंकून खळबळ उडवून दिली आणि धोनीचे स्टारडम शिगेला पोहोचले. पण या काळातही, त्याचे वडील पान सिंग आणि आई देवकी देवी त्याला खेळताना पाहण्यासाठी कधीही जगातील कोणत्याही स्टेडियममध्ये गेले नाहीत.
दिल्लीने चेन्नईसमोर ठेवले १८५ धावांचे लक्ष्य –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ६ गडी गमावून १८३ धावा केल्या. शेवटच्या ५ षटकांत फक्त ४५ धावा झाल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने ५१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि ३ षटकार आले. अभिषेक पोरेलने ३३, अक्षर पटेलने २१ आणि ट्रेस्टन स्टब्सने नाबाद २४ धावा केल्या. चेन्नईकडून खलील अहमदने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.





