Sanju Samson Century : संजू सॅमसन नावाचं वादळ चेन्नईत धडकलं! ५२ चेंडूमध्ये शतक झळकावत डिव्हिलियर्स-वॉर्नरचा मोडला विक्रम
Sanju Samson Century : संजू सॅमसनने आयपीएल 2026 मधील पहिलं शतक झळकावत अनेक दिग्गजांना टाकलं मागे.

Sanju Samson Century vs Delhi Capitals : चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवरील आयपीएल २०२६ च्या १८ व्या सामन्यात संजू सॅमसनने आपल्या बॅटने अक्षरशः आग ओकली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना संजूने केवळ या हंगामातील पहिले शतक झळकावले नाही, तर जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांचे विक्रमही मोडीत काढले.
सुरुवातीच्या तीन सामन्यांत फ्लॉप ठरलेल्या संजू सॅमसनने टीकाकारांना आपल्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलामीला येऊन संजूने अवघ्या ५२ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने ५६ चेंडूंत १४ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ११५ धावांची खेळी साकारली. या शतकामुळे चेन्नई सुपर किंग्सने (CSK) फलकावर २१२ धावांचा डोंगर उभा केला.
वॉर्नर-डिव्हिलियर्सला टाकलं मागे –
📸📸
A 𝙎𝙖𝙣𝙟𝙪 𝙎𝙖𝙢𝙨𝙤𝙣 𝙎𝙥𝙚𝙘𝙞𝙖𝙡 in Chennai 🫡💯
Updates ▶️ https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #KhelBindaas | #CSKvDC pic.twitter.com/u2TWFHmNYj
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026
संजू सॅमसनच्या आयपीएल कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले आहे. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा (३ शतके) विक्रम मोडीत काढला आहे. तसेच, ४ शतके झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली असली, तरी संजूने वॉर्नरपेक्षा कमी डावांत हा टप्पा गाठला आहे. संजूने आतापर्यंत २०१७, २०१९, २०२१ आणि आता २०२६ मध्ये शतकी खेळी केल्या आहेत.
𝗜𝗻𝗻𝗼𝘃𝗮𝘁𝗶𝘃𝗲. 𝗣𝗼𝘄𝗲𝗿𝗳𝘂𝗹. 𝗛𝗶𝗴𝗵𝗹𝘆 𝗜𝗺𝗽𝗮𝗰𝘁𝗳𝘂𝗹. 🔥
Drop an emoji for Sanju Samson's performance tonight? 👇
Scorecard ▶️ https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #KhelBindaas | #CSKvDC | @IamSanjuSamson pic.twitter.com/gI918IKo2i
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026
संजू सॅमसनची आयपीएल मधील शतकं:
- १०२ (६३) विरुद्ध आरपीएस, पुणे, २०१७
- १०२* (५५) विरुद्ध एसआरएच, हैदराबाद, २०१९
- ११५* (५६) विरुद्ध डीसी, चेन्नई, २०२६
- ११९ (६३) विरुद्ध पीबीकेएस, वानखेडे, २०२१
संजूची सीएसकेच्या ‘एलिट’ क्लबमध्ये एन्ट्री –
चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही संजूने स्थान मिळवले आहे. मुरली विजय (१२७), शेन वॉटसन (११७*) आणि माईक हसी (११६*) यांच्यानंतर संजूची ११५* धावांची खेळी ही सीएसकेच्या इतिहासातील चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. सॅमसनच्या या पुनरागमनामुळे चेन्नईच्या संघात आनंदाचे वातावरण असून ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीतही तो आता सामील झाला आहे.





