CSK vs DC : संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर सीएसकेने उघडलं विजयाचं खातं! दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव
CSK vs DC : सीएसकेने दिल्ली कॅपिटल्स २३ धावांनी पराभव करत यंदाच्या हंगामातील पहिलावहिला विजय नोंदवला आहे.

CSK vs DC Chennai Super Kings register 1st win IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या १८ व्या सामन्यात अखेर चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. शनिवारी ११ एप्रिल रोजी चेपॉक मैदानावर झालेल्या अटीतटीच्या लढतीत चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) २३ धावांनी पराभव केला. संजू सॅमसनच्या वादळी शतकानंतर जेमी ओव्हरटनच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नईला या हंगामातील पहिला विजय मिळाला.
सलग तीन पराभवांचा धक्का बसलेल्या चेन्नई सुपर किंग्सने घरच्या मैदानावर जोरदार पुनरागमन केले आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत २१२ धावांचा डोंगरासारखा स्कोर उभा केला. प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सचा संघ १८९ धावांवर गारद झाला. दिल्लीसाठी ट्रिस्टन स्टब्सने ६० आणि पथुम निसांकाने ४१ धावांची झुंजार खेळी केली, मात्र इतर फलंदाजांच्या अपयशामुळे दिल्लीला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
#CSK fans, bring out the whistles 💛
A first win of the season for the 5⃣-time #TATAIPL champions 👏
Scorecard ▶️ https://t.co/BzGc6O65jX #KhelBindaas | #CSKvDC | @ChennaiIPL pic.twitter.com/tS2xyOWgdj
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026
संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रेचा धमाका –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांनी ६२ धावांच्या सलामीसह दमदार करून दिली. गायकवाड (१५) बाद झाल्यावर संजूने युवा आयुष म्हात्रे सोबत दिल्लीच्या गोलंदाजांची पिसं काढली. म्हात्रेने ३६ चेंडूत ५९ धावा कुटल्या आणि तो ‘रिटायर्ड आऊट’ झाला. त्यानंतर संजू सॅमसनने आपले चौथे आयपीएल शतक झळकावत ५६ चेंडूत नाबाद ११५ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात शिवम दुबेने १० चेंडूत २० धावा जोडून धावफलक २१२ पर्यंत नेला.
ओव्हरटन आणि कंबोजची धारदार गोलंदाजी –
Eyes on the ball till the end 👀
Akeal Hosein holds onto a brilliant catch 🫡#CSK tightning the grip 👌
Updates ▶️ https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #KhelBindaas | #CSKvDC pic.twitter.com/YgG7XfO50J
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026
प्रत्युत्तरात २१३ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. चेन्नईचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनने ४ महत्त्वाचे बळी घेत दिल्लीची कंबर तोडली. त्याला अंशुल कंबोजने ३ बळी घेत मोलाची साथ दिली. खलील अहमद, नूर अहमद आणि गुरजपनीत सिंह यांनी प्रत्येकी १ बळी टिपला. या विजयामुळे चेन्नईच्या गोटात आनंदाचे वातावरण असून गुणतालिकेतही त्यांनी प्रगती केली आहे.





