Sanju Samson Century : संजू सॅमसनला गवसला सूर…! IPL 2026 मधील पहिलं शतक झळकावत मोडला धोनीचा विक्रम
Sanju Samson Century : या हंगामातील पहिले शतक झळकावण्याचा मान संजूने मिळवला असून, त्याने थेट दिग्गज महेंद्रसिंह धोनीचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

Sanju Samson Century in IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या संजू सॅमसनने आपल्या बॅटने नवा इतिहास रचला आहे. १८ व्या सामन्यात संजूने केवळ ५२ चेंडूत शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, या हंगामात शंभर धावांचा टप्पा पार करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. संजूने मैदानाच्या चारी बाजूंना फटकेबाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पिसं काढली. यासह त्याने धोनीचा विक्रम मोडला.
एमएस धोनीला टाकलं मागे –
संजू सॅमसनने या शतकासह सीएसकेसाठी यष्टीरक्षक-फलंदाज (Wicketkeeper-Batter) म्हणून सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीने चेन्नईसाठी यष्टीरक्षक म्हणून ८४ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. धोनी सहसा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, तर संजू सलामीला किंवा टॉप ऑर्डरमध्ये खेळतो, ज्याचा फायदा घेत त्याने धोनीचा हा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे पहिल्या तीन सामन्यात तो अपयशी ठरला होता.
𝗜𝗻𝗻𝗼𝘃𝗮𝘁𝗶𝘃𝗲. 𝗣𝗼𝘄𝗲𝗿𝗳𝘂𝗹. 𝗛𝗶𝗴𝗵𝗹𝘆 𝗜𝗺𝗽𝗮𝗰𝘁𝗳𝘂𝗹. 🔥
Drop an emoji for Sanju Samson’s performance tonight? 👇
Scorecard ▶️ https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #KhelBindaas | #CSKvDC | @IamSanjuSamson pic.twitter.com/gI918IKo2i
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026
संजूचे आयपीएल कारकिर्दीतील चौथे शतक –
📸📸
A 𝙎𝙖𝙣𝙟𝙪 𝙎𝙖𝙢𝙨𝙤𝙣 𝙎𝙥𝙚𝙘𝙞𝙖𝙡 in Chennai 🫡💯
Updates ▶️ https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #KhelBindaas | #CSKvDC pic.twitter.com/u2TWFHmNYj
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026
संजू सॅमसनच्या आयपीएल कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. या कामगिरीसह त्याने डेव्हिड वॉर्नर आणि शुभमन गिल यांच्या ४ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या (८) नावावर आहे, तर जोस बटलर ७ शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. ख्रिस गेलने ६ आणि केएल राहुलने ५ शतके झळकावली आहेत. चेन्नईसाठी आपल्या पहिल्याच हंगामात संजूने केलेली ही कामगिरी चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे.
संजूने आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्या संघांविरुद्ध शतके झळकावली आहेत?
संजू सॅमसनने आपले पहिले आयपीएल शतक २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध झळकावले. त्या सामन्यात त्याने ६३ चेंडूंमध्ये १०२ धावा केल्या होत्या. त्याचे पुढचे शतक एसआरएचविरुद्ध नाबाद १०२ धावांचे होते. २०२१ मध्ये, संजूने पंजाब किंग्सविरुद्ध ६३ चेंडूंमध्ये ११९ धावा केल्या. आता, त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शतक झळकावले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शतक झळकावणारा तो सीएसकेचा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी मुरली विजयने २०१२ मध्ये याच मैदानावर ही कामगिरी केली होती. त्याने ५८ चेंडूंमध्ये ११३ धावा केल्या होत्या.





