MS Dhoni Return : सीएसकेच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! धोनी-ब्रेव्हिसच्या पुनरागमनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
MS Dhoni Return : सलग तीन पराभवांमुळे बॅक फूटवर गेलेल्या सीएसके छावणीतून अखेर एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

MS Dhoni Return IPL 2026 CSK vs DC : आयपीएल २०२६ च्या हंगामात सलग तीन पराभवांमुळे बॅकफूटवर गेलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) छावणीतून अखेर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघाचा आधारस्तंभ महेंद्रसिंग धोनी आणि युवा स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस संघात परतण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पाचवेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाच्या हंगामाची सुरुवात एखाद्या स्वप्नवत धक्क्यासारखी झाली आहे. पहिल्या तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्याने संघ गुणतालिकेत तळाला फेकला गेला आहे. मात्र, येत्या शनिवारी चेपॉकच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी सीएसकेला मोठा दिलासा मिळाला आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेला महेंद्रसिंग धोनी आता मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
धोनीची ‘फिटनेस टेस्ट’ आणि पुनरागमन –
🚨 MS DHONI IS STILL NOT FIT ENOUGH FOR THE UPCOMING MATCH 🚨
CSK management confirmed Dhoni is still recovering and will miss at least two weeks. While seeing him in the nets at Chepauk is a positive sign, he’s only practicing because the team is local. Don’t expect him onfield pic.twitter.com/qY8RYXvQPr
— DB (@Brevisnation7) April 2, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनीला प्री-सीझन कॅम्पदरम्यान दुखापत झाली होती, ज्यामुळे तो सुरुवातीच्या तीन सामन्यांना मुकला होता. आता धोनीची अंतिम फिटनेस टेस्ट होणार असून, त्यामध्ये तो यशस्वी ठरल्यास शनिवारी ‘यलो आर्मी’चे नेतृत्व करताना किंवा मार्गदर्शकाच्या भूमिकेत मैदानात दिसू शकतो. धोनीच्या अनुभवामुळे चेन्नईच्या विखुरलेल्या रणनीतीला पुन्हा एकदा शिस्त मिळण्याची अपेक्षा आहे.
‘बेबी एबी’ देणार मधल्या फळीला बळकटी –
केवळ धोनीच नाही, तर दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस (Baby AB) देखील दुखापतीतून सावरला आहे. चेन्नईची मधल्या फळीतील फलंदाजी गेल्या तीन सामन्यांत कमकुवत भासली होती. ब्रेव्हिसच्या पुनरागमनामुळे संघाला आक्रमक वेग मिळण्यास मदत होईल. चेपॉकच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर ब्रेव्हिस आणि धोनीची जोडी प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते.सलग तीन पराभवांच्या नामुष्कीनंतर, चेन्नईचे चाहते आता आपल्या लाडक्या ‘थाला’ला मैदानात पाहण्यासाठी आणि विजयाचे खाते उघडण्यासाठी आतुर झाले आहेत.





