Sanju Samson : ‘पत्नी नव्हे तर, ‘ही’ व्यक्ती आहे संजूची लकी चार्म!’ शतक झळकावल्यानंतर केला खुलासा
Sanju Samson Century : आयपीएल २०२६ च्या हंगामात आतापर्यंत शांत असलेल्या संजू सॅमसनच्या बॅटने अखेर जोरदार पुनरागमन केले आहे.

Who is Lucky Person for Sanju Samson : आयपीएल २०२६ च्या हंगामात आतापर्यंत शांत असलेली संजू सॅमसनची बॅट अखेर तळपली असून जोरदार पुनरागमन केले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संजूने केवळ ५२ चेंडू शतक झळकावले. यानंतर संजू सॅमसनने आपल्या या यशासाठी ‘लकी पर्सन कोण’ आहे? याबाबत मोठा खुलासा. विशेष म्हणजे त्याने आपल्या पत्नीचे नाव न घेता एका अशा व्यक्तीचे नाव घेतले, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
गेल्या महिन्यात भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा संजू सॅमसन आयपीएलच्या पहिल्या तीन सामन्यांत अपयशी ठरला होता. मात्र, चौथ्या सामन्यात त्याने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. ५६ चेंडूंत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ११५ धावांची खेळी करत संजूने चेन्नई सुपर किंग्सला २१२ धावांपर्यंत पोहोचवले.
SANJU SAMSON TO RAVI SHASTRI. 🗣️
“Please come every match, Ravi sir. You seem to be my lucky charm”. pic.twitter.com/N9Mz4tCmmP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2026
“रवी भाई, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात!”
Ravi Shastri has been LUCKY for Indian Cricket. pic.twitter.com/7In51fIWwZ
— Aakash Jain (@CricTalkbyAJ) April 11, 2026
शतकानंतर संजू सॅमसनने मैदानावर रवी शास्त्री यांच्याशी संवाद साधताना एक मजेशीर आणि भावनिक खुलासा केला. संजू म्हणाला, “रवी भाई, मला खूप छान वाटतंय. तुम्ही माझ्यासाठी आता ‘लकी पर्सन’ बनला आहात. तुम्हाला भेटल्यानंतर माझी नशिबाची दारं उघडतात. कृपया माझ्या प्रत्येक मॅचला येत जा. देशासाठी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर येथे आल्यावर थोडा खराब काळ आला, मनात शंका निर्माण झाल्या होत्या, पण स्वतःच्या बेसिक्सवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं.”
केएल राहुलच्या विक्रमाशी बरोबरी –
संजू सॅमसनने या शतकासह आयपीएलमधील एका खास विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएल इतिहासात तीन वेगवेगळ्या संघांकडून (दिल्ली, राजस्थान आणि आता चेन्नई) शतक झळकावणारा तो केएल राहुलनंतरचा केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. संजूने या सामन्यात सलामीला येत ऋतुराज गायकवाडसोबत डावाची सुरुवात केली आणि त्यानंतर युवा खेळाडू आयुष म्हात्रेच्या (५९) सोबतीने दिल्लीच्या गोलंदाजांची पिसं काढली.





