Abhishek Sharma Video : ‘…अन् सर्वांसमोर तिने अचानक ओढला अभिषेक शर्माचा हात, फलंदाजही झाला अवाक्’, पाहा VIDEO
Abhishek Sharma Video : हॉटेलबाहेर पडताना एका तरुणीने अभिषेकचा हात ओढल्याचा प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Female fan grabbing Abhishek Sharma hand Video Viral : सनरायझर्स हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा सध्या आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आहेच, पण नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडिओमुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. हॉटेलबाहेर पडताना एका तरुणीने अभिषेकचा हात ओढल्याचा प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम हॉटेलमधून बाहेर पडत असताना, चाहत्यांच्या गर्दीतून एका तरुणीने अचानक अभिषेकचा हात पकडून त्याला स्वतःकडे खेचले. या अनपेक्षित प्रकारामुळे अभिषेक काही काळ गोंधळून गेला आणि थक्क झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने मध्यस्थी केली आणि अभिषेकचा हात सोडवून त्याला सुरक्षितपणे बसपर्यंत पोहोचवले.
यह अभिषेक शर्मा की दीवानगी हैं🤎💜
टीम होटल से जब निकल रही थी अभिषेक शर्मा बाहर निकलते हैं और
एक लड़की जबरदस्ती अभिषेक शर्मा का हाथ पकड़ कर खींचती है
शर्मा जीकी दीवानगी लड़कियों में बहुत ज्यादा है pic.twitter.com/ma5JN7LcNV
— Prem singh meena (@TATUPREM5555) April 26, 2026
Dumbest behaviour by a girl—pulling Abhishek Sharma like that.
Abhishek and SRH players were shocked 😱 pic.twitter.com/ZdkAQTNpgh
— Sonu (@Cricket_live247) April 26, 2026
मैदानावरही अभिषेकचाच जलवा –
> Meet Himshikha Tripathi.
> This is the same girl who grabbed Abhishek Sharma’s hand and pulled him toward her.
> To put it plainly, she harassed Abhishek Sharma, after which she posted the video from her own account.
> She even wrote the caption with great pride – Girls,… pic.twitter.com/616GLdAHig
— Riya ✨ (@rudemiss18) April 26, 2026
या धक्कादायक घटनेचा अभिषेकच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने २२९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना २९ चेंडूंत ५७ धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अभिषेकच्या या खेळीमुळे हैदराबादने हे कठीण लक्ष्य ९ चेंडू राखून पूर्ण केले. या सामन्यात राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीचे शतकही व्यर्थ ठरले.
ऑरेंज कॅपवर अभिषेकचे नाव –
FOR THE FIRST TIME EVER, THE ORANGE CAP GOT CLAIMED BY FOUR DIFFERENT PLAYERS IN ONE DAY.
Morning – Virat Kohli
Afternoon – KL Rahul
Evening – Vaibhav Suryavanshi
Night – Abhishek Sharma#iplseason pic.twitter.com/CalXa2elQK— IndiaThinkTank (@IndiaThinksTank) April 26, 2026
अभिषेक शर्मा सध्या आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ८ सामन्यांत ५४ च्या सरासरीने आणि २१२ च्या स्ट्राइक रेटने ३८० धावा कुटल्या आहेत. त्याच्या नावावर सध्या ऑरेंज कॅप असून त्याने आतापर्यंत ३६ चौकार आणि २८ षटकार लगावले आहेत. अभिषेकच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेकदा सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.





