RR vs SRH : हैदराबादचे नवाब दुसऱ्यांदा राजस्थानवर पडले भारी! अभिषेक-इशानच्या भागीदारीने वैभवच्या शतकावर फेरलं पाणी!
RR vs SRH : सनरायझर्स हैदराबादने या मोसमात राजस्थान रॉयल्सवर सलग दुसरा विजय मिळवून आपला दबदबा सिद्ध केला आहे.

SRH vs RR Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals : आयपीएल २०२६ च्या ३६ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सचा त्यांच्याच घरात ५ गडी राखून पराभव केला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या या हाय-स्कोअरिंग सामन्यात हैदराबादने राजस्थानने दिलेले २२९ धावांचे विशाल लक्ष्य १८.३ षटकांत पूर्ण करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हैदराबादच्या अभिषेक आणि इशानच्या अर्धशतकाने वैभवच्या वादळी शतकावर पाणी फेरलं.
हैदराबादने दुसऱ्यांदा केली राजस्थानवर मात –
सनरायझर्स हैदराबादने या मोसमात राजस्थान रॉयल्सवर सलग दुसरा विजय मिळवून आपला दबदबा सिद्ध केला आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या (१०३) ऐतिहासिक शतकाच्या जोरावर २२८ धावांचे आव्हान उभे केले होते. मात्र, हैदराबादच्या फलंदाजांनी जयपूरच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडत हे कठीण लक्ष्य सहज गाठले.
The Finishing Act 💥
Heinrich Klaasen 🤝 Nitish Kumar Reddy
A crucial 5⃣3⃣-run stand between these two 🧡
Updates ▶️ https://t.co/PVdpjhxVEy#TATAIPL | #KhelBindaas | #RRvSRH | @SunRisers pic.twitter.com/cv86yXGGde
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
इशान-अभिषेकची वादळी भागीदारी –
𝘽𝙖𝙙𝙖𝙗𝙖𝙖𝙜𝙣𝙞𝙠𝙞 𝙅𝙖𝙙𝙞𝙫𝙖𝙖𝙣𝙖𝙠𝙞 𝘿𝙤𝙨𝙩𝙞 🧡🫂 pic.twitter.com/SJyyLHCrKN
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 25, 2026
प्रत्युत्तरात २२९ धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली आणि ट्रॅव्हिस हेड (६) स्वस्तात परतला. मात्र, त्यानंतर इशान किशन (७४) आणि अभिषेक शर्मा (५७) या जोडीने राजस्थानच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची ‘मॅच विनिंग’ भागीदारी केली. इशानने ३१ चेंडूंत ७४ धावांची तुफानी खेळी केली, तर अभिषेकने २९ चेंडूंत ५७ धावा कुटल्या. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी (३६) आणि हेनरिक क्लासेन (२९) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. सलिल अरोराने विजयी षटकार मारून हैदराबादला मोठा विजय मिळवून दिला.
वैभव सूर्यवंशीचं वादळ आणि जुरेलची साथ –
1⃣0⃣3⃣(37) of absolute FORCE 🫶
We are short of words, Vaibhav Sooryavanshi 🫡
Updates ▶️ https://t.co/PVdpjhxVEy#TATAIPL | #KhelBindaas | #RRvSRH | @rajasthanroyals pic.twitter.com/HRjVHZyRa3
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात जेमतेम झाली. यशस्वी जयस्वाल १० धावांवर बाद झाला. पण त्यानंतर १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने केवळ ३६ चेंडूंत आयपीएल इतिहासातील तिसरे सर्वात वेगवान शतक ठोकून सर्वांना थक्क केले. त्याने आपल्या १०३ धावांच्या खेळीत १२ उत्तुंग षटकार लगावले. त्याला ध्रुव जुरेलने (५१) खंबीर साथ देत ६२ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. मात्र, राजस्थानच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही, ज्याचा फटका त्यांना पराभवाच्या रूपाने बसला.





