Vaibhav Sooryavanshi Prediction : बसच्या काचेवर लिहिलं अन् मैदानात करून दाखवलं! वैभवच्या भविष्यवाणीने चाहते थक्क; पाहा ‘तो’ VIDEO
Vaibhav Sooryavanshi Prediction : मॅच सुरू होण्यापूर्वी त्याने दिलेला एक शब्द त्याने मैदानात उतरताच खरा करून दाखवला आहे

Vaibhav Sooryavanshi Century Prediction Video Viral : राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी त्याने दिलेला एक शब्द त्याने मैदानात उतरताच खरा करून दाखवला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. वैभव सूर्यवंशीने नक्की कोणता शब्द दिला होता? जाणून घ्या
वैभवने नक्की काय दिला होता शब्द?
राजस्थान रॉयल्सने (RR) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. २५ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी हॉटेलमधून निघताना, वैभवने टीम बसच्या काचेवर ‘शतक’ करण्याचा इशारा केला होता. तेव्हा ही केवळ एक इच्छा वाटली होती, मात्र वैभवने ३७ चेंडूत १०३ धावांची झंझावाती खेळी करत दिलेला शब्द पाळला. फ्रँचायझीने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, “वैभवने दिलेला शब्द पूर्ण केला!”
Before leaving for the game today, Vaibhav Sooryavanshi manifested a 100. Promised. Delivered! 🔥💗 pic.twitter.com/bDOcrkBujF
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 25, 2026
धावांचा पाऊस आणि विक्रमी दशतक –
वैभवने या सामन्यात २७८.३७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना १२ उत्तुंग षटकार आणि ५ चौकार ठोकले. केवळ शतकच नाही, तर वयाच्या अवघ्या १५ वर्षे २९ व्या दिवशी त्याने टी-२० क्रिकेटमधील १००० धावांचा टप्पाही पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या २६ व्या डावात हा मैलाचा दगड गाठला असून, सर्वात वेगवान भारतीय फलंदाजांच्या यादीतही स्थान मिळवले आहे.
विस्फोटक खेळीनंतरही राजस्थानचा पराभव –
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २२८ धावांचा डोंगर उभा केला होता. वैभवच्या १०३ धावांव्यतिरिक्त ध्रुव जुरेलने ५२ आणि डोनोव्हन फरेराने ३३ धावांचे योगदान दिले. मात्र, हैदराबादच्या फलंदाजांपुढे हे लक्ष्य अपुरे पडले. इशान किशनच्या (७४) वादळी खेळीच्या जोरावर हैदराबादने १८.३ षटकांत ५ गडी राखून विजय मिळवला. इशान किशनला त्याच्या सामनाविजेत्या खेळीसाठी ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.





