\n

चांगल्या सुरुवातीनंतर आरसीबीचा डाव फसला आणि त्यांनी रजत पाटीदारच्या रूपाने 9 व्या षटकात 111 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली. पाच चेंडूत नऊ धावा करून पाटीदार बाद झाला. मयंक मार्कंडेने पाटीदारला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मार्कंडेची या सामन्यातील ही दुसरी विकेट होती. त्यानंतर लगेगच पॅट कमिन्सने 9.3 षटकात कर्णधार फॅफ डुप्लेसिसला बाद करून आरसीबीला चौथा आणि मोठा धक्का दिला. जबरदस्त फॉर्मात दिसत असलेला डुप्लेसिस 28 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 62 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सौरव चौहानला खाते न उघडताच बाद करून आरसीबीला पाचवा धक्का दिला. कमिन्सने त्याच षटकात डुप्लेसिसला बाद केले आणि शेवटच्या चेंडूवर सौरवलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तेव्हा आरसीबीला 60 चेंडूत विजयासाठी 166 धावांची गरज होती.

\n

त्यानंतर दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी आरसीबीचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी 13वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मयंक मार्कंडेच्या षटकातून 25 धावा काढल्या आणि आरसीबीने 13 षटकांअखेर पाच गड्यांच्या मोबदल्यात 160 धावसंख्येपर्यत मजल मारली होती, पण हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने शानदार गोलंदाजी करत 14.1 षटकात 181 धावसंख्येवर महिपाल लोमरोरला बाद करत सहावा धक्का दिला. लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांनी विकेटचे धक्के बसल्यानंतर आरसीबीचा डाव सावरला होता, मात्र कमिन्सने लोमरला बाद करून ही भागीदारी तोडली. लोमरोर 11 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. कमिन्सची या सामन्यातील ही तिसरी विकेट होती.

\n

बेंगळुरूची सातवी विकेट 18.5 षटकांत 244 धावांवर पडली. 35 चेंडूत 83 धावा करून दिनेश कार्तिक बाद झाला. त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 7 षटकार आले. दिनेश कार्तिकने 83 धावांची तुफानी खेळी केली, मात्र तो आरसीबीला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. अखेर बेंगळुरू संघाला 20 षटकात 7 बाद 262 धावांपर्यतच मजल मारता आली आणि सामना गमवावा लागला. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने 43 धावांत सर्वाधिक तीन बळी घेतले.

\n

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 20 षटकात 3 विकेट गमावताना 287 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.

\n
\n

Innings Break!

\n

A batting carnage in Chinnaswamy as @SunRisers have set a record 🎯 of 288 🔥#RCB chase coming up shortly!

\n

Scorecard ▶️ https://t.co/OOJP7G9bLr#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/okSG4l2A3b

\n

— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2024

\n

\n

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्याच षटकात शानदार फलंदाजी करत डुप्लेसिसचा निर्णय चुकीचा सिद्ध करण्यास जास्त वेळ लावला नाही. दोन्ही फलंदाजांनी तुफानी फलंदाजी करत अवघ्या 27 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. पॉवरप्ले संपेपर्यंत हैदराबादने एकही विकेट न गमावता 76 धावा केल्या होत्या.

\n

आठव्या षटकातच अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड ( Travis Head ) यांनी संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेल्याने SRHची सुरुवात चांगली झाली. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने अवघ्या 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि 41 धावांच्या खेळीत 102 धावा केल्या. हेडने या काळात 9 चौकार आणि 8 षटकारही मारले. त्यानंतर हेनरिक क्लासेननेही तडाखेबाज खेळी केली त्याने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. क्लासेनने 31 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार आणि 7 षटकारांसह 67 धावा केल्या.

\n

SRH ने पहिल्या 10 षटकांत 128 धावा केल्या होत्या आणि पुढच्या 10 षटकांतही धावगती कमी झाली नाही. 11व्या ते 20व्या षटकापर्यंत, हैदराबादच्या फलंदाजांनी 11व्या षटकानंतर एकही षटक सोडले नाही ज्यामध्ये 10 पेक्षा कमी धावा झाल्या. हैदराबादच्या डावाच्या सुरुवातीला अभिषेक शर्माने 22 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. शेवटी एडन मार्कराम आणि अब्दुल समद यांनी तुफानी फलंदाजी केली. एकीकडे मार्करामने 17 चेंडूत 32 धावा केल्या तर अब्दुल समदने 10 चेंडूत 37 धावांची शानदार खेळी केली.

\n

IPL 2024 : एका IPL सामन्यातून चीअरलीडर्स किती कमावतात ? तुम्हालाही जाणून वाटेल आश्चर्य….

\n

\n

SRH ने शेवटच्या 5 षटकात 83 धावा काढत बेंगळुरूच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 277 धावा केल्या होत्या, पण RCB विरुद्धच्या सामन्यात त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत 287 धावा करत हा विक्रम कायम राखला. हेडने 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले जे आयपीएलच्या इतिहासातील चौथे जलद शतक ठरले. फर्ग्युसनने हेडचा ( #TravisHead ) डाव संपवला. एकेकाळी संघ 300 धावा करेल असे वाटत होते, पण आधी हेड आणि नंतर क्लासेन बाद झाल्यामुळे हे शक्य झाले नाही.

\n

IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : ट्रॅव्हिस हेडचे आरसीबीविरुद्ध तुफान, एका जलद शतकी खेळीसह मोडीत काढले अनेक विक्रम…

\n

\n

आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच केली धुलाई…

\n

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाला चांगलाच फटका बसला. लॉकी फर्ग्युसनने त्याच्या पुनरागमन सामन्यात निश्चितपणे 2 विकेट घेतल्या, परंतु 4 षटकात 52 धावा दिल्या. रीस टोपलीनेही एक विकेट घेतली, पण त्याने 4 षटकांत 68 धावा दिल्या. विजयकुमार विशाक आणि यश दयाल हे महागडे गोलंदाज ठरले. आणिने 4 षटकात 64 तर यशने 4 षटकात 51 धावा दिल्या.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : 287 धावा केल्यानंतरही हैदराबादचा अवघ्या 25 धावांनी विजय, बेंगळुरूचा सहावा पराभव…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/rcb-5.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-rcb-vs-srh-match-30-ipl-2024-rcb-vs-srh-match-30-royal-challengers-bangalore-lost-badly-against-sunrisers-hyderabad#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/rcb-5.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-rcb-vs-srh-match-30-ipl-2024-rcb-vs-srh-match-30-royal-challengers-bangalore-lost-badly-against-sunrisers-hyderabad#webpage","name":"IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : 287 धावा केल्यानंतरही हैदराबादचा अवघ्या 25 धावांनी विजय, बेंगळुरूचा सहावा पराभव…","url":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-rcb-vs-srh-match-30-ipl-2024-rcb-vs-srh-match-30-royal-challengers-bangalore-lost-badly-against-sunrisers-hyderabad","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-rcb-vs-srh-match-30-ipl-2024-rcb-vs-srh-match-30-royal-challengers-bangalore-lost-badly-against-sunrisers-hyderabad#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/rcb-5.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-rcb-vs-srh-match-30-ipl-2024-rcb-vs-srh-match-30-royal-challengers-bangalore-lost-badly-against-sunrisers-hyderabad#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-rcb-vs-srh-match-30-ipl-2024-rcb-vs-srh-match-30-royal-challengers-bangalore-lost-badly-against-sunrisers-hyderabad","name":"IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : 287 धावा केल्यानंतरही हैदराबादचा अवघ्या 25 धावांनी विजय, बेंगळुरूचा सहावा पराभव…"}}]}}}

IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : 287 धावा केल्यानंतरही हैदराबादचा अवघ्या 25 धावांनी विजय, बेंगळुरूचा सहावा पराभव…