IPL 2024 (RCB vs CSK Match 68) : बेंगळुरू आणि चेन्नई आज प्ले-ऑफच्या तिकिटासाठी भिडणार..! जाणून घ्या, Weather आणि Pitch रिपोर्टसह इतर सर्व डिटेल्स एका क्लिकवर…

IPL 2024 (Royal challengers Bengaluru vs Chennai Super Kings) : आयपीएल 2024 च्या प्लेऑफसाठी तीन संघ निश्चित झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सनंतर सनरायझर्स हैदराबादनेही प्लेऑफचे तिकीट मिळवले. आता चौथा संघ आज (शनिवार, 18 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने निश्चित होईल. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. पावसामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास RCB चा IPL 2024 चा प्रवास संपुष्टात येऊ शकतो. ही एक प्रकारे व्हर्च्युअल नॉकआउट आहे. पराभूत होणारा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही.
चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी एका गुणाची गरज आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना रद्द झाला तर चेन्नईला लाॅटरीच लागेल. त्याचवेळी आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर चेन्नईला कोणत्याही किंमतीत हरवावे लागेल. जर आरसीबीने प्रथम फलंदाजी करून 200 धावा केल्या तर त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सीएसकेला 18 धावांनी पराभूत करावे लागेल आणि जर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला लक्ष्याचा पाठलाग करून प्लेऑफ गाठायचे असेल तर त्यांना चेन्नईवर 11 चेंडू राखून विजय मिळवावा लागेल.
Head to Head Record : सीएसकेविरुद्ध आरसीबीचा रेकॉर्ड खराब…
आयपीएलमध्ये आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आतापर्यंत 32 सामने झाले आहेत. यापैकी आरसीबीने 10 आणि सीएसकेने 21 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये 10 सामने झाले आहेत, त्यातही चेन्नई सुपर किंग्ज 5-4 ने पुढे आहे. या मोसमात चेन्नईमध्ये या दोन संघांत झालेला सामना सीएसकेने 6 गडी राखून जिंकला होता. जर आपण मागील पाच सामन्यांबद्दल बोललो तर सीएसकेने 4 आणि आरसीबीने फक्त एक सामना जिंकला आहे.
Pitch Report (खेळपट्टीचा अहवाल)
एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी सामान्यत: फलंदाजीसाठी अनुकूल असते आणि वेगवान आउटफिल्ड फलंदाजी अधिक सोपे करते. आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादने या मैदानावर 287 धावांची विक्रमी खेळी केली होती. आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यातही अनेक धावांची अपेक्षा असेल. दुसऱ्या डावात दव पडत असल्याने फलंदाजी करणे सोपे जाते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
IPL 2024 मधील चिन्नास्वामी स्टेडियमवरील आकडेवारी
आयपीएल 2024 मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत 6 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 वेळा आणि पाठलाग करणाऱ्या संघाने तेवढ्याच वेळा विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या घरच्या मैदानावर सलग 2 सामने जिंकले असून आता ते विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न करतील. आयपीएलच्या इतिहासात सीएसकेने या मैदानावर 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 वेळा संघाने विजय मिळवला आहे.
Weather Rport : हवामान अंदाज…
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सामन्याची दिवशी ढगाळ वातावरण राहिल आणि पावसाची शक्यता असेल. तसेच जोरदार वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, शनिवारी बेंगळुरूमध्ये पावसाची शक्यता 75 टक्के आहे.
धोनीचा अनुभव सीएसकेसाठी उपयुक्त ठरेल
धोनी कदाचित या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार नसेल. पण, एक लीडर आणि ज्येष्ठ खेळाडू म्हणून त्यांची संघावर पकड अजूनही आहे. महत्त्वाच्या प्रसंगी त्याने कर्णधार रुतुराजला योग्य निर्णय घेण्यात मदत केली आहे. अशा परिस्थितीत धोनीचा अनुभव आरसीबीविरुद्धही उपयुक्त ठरू शकतो. आयपीएल 2024 च्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली आघाडीवर आहे. त्याने 13 डावात 661 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा वगळता, कोणताही CSK गोलंदाज कोहलीला T20 सामन्यांमध्ये अडचणीत आणू शकला नाही आणि तो CSK गोलंदाजांविरुद्ध 122 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करतो. अशा स्थितीत कोहलीला रोखण्यासाठी धोनीचा अनुभव उपयुक्त ठरेल.





