Ryan Rickelton Century : रायन रिकल्टनने मुंबईसाठी झळकावलं ऐतिहासिक शतक; ४४ बॉलमध्ये सेंच्युरी झळकावत मोडला १८ वर्षांचा विक्रम
Ryan Rickelton Century : या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी शतक झळकावणारा रिकल्टन हा तिसरा फलंदाज ठरला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या वर्षी मुंबईसाठी झालेली तिन्ही शतके ही डावखुऱ्या फलंदाजांनीच ठोकली आहेत.

Ryan Rickelton Fastest IPL Century MI IPL 2026 : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२६ चा हंगाम कठीण जात असला, तरी त्यांच्या फलंदाजांनी मात्र मैदानात विक्रमांचा पाऊस पाडला आहे. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात रायन रिकल्टनने अवघ्या ४४ चेंडूंत वादळी शतक ठोकून मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील १८ वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे.
रायन रिकल्टनने ठोकलं वादळी शतकं –
क्विंटन डिकॉक दुखापतीमुळे बाहेर असल्याने रायन रिकल्टनला प्लेइंग-११ मध्ये संधी मिळाली. या संधीचे सोने करत रिकल्टनने हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे काढली आणि केवळ ४४ चेंडूंत आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. त्याने ५५ चेंडूंचा सामना करताना १० चौकार ८ षटकारांच्या जोरावर नाबाद १२३ धावांची वादळी खेळी साकारली. या खेळाडूच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकात ५ बाद २४३ धावांचा डोंगर उभारला असून हैदराबादसमोर २४४ धावांचे लक्ष्य ठेवले.
🚨 RYAN RICKELTON HAS THE FASTEST HUNDRED FOR MUMBAI INDIANS IN THE IPL. 🚨
– A Chris Gayle inspired celebration. 🥶🔥 pic.twitter.com/RElOkEEtu7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 29, 2026
सनथ जयसूर्याचा विक्रम इतिहासजमा –
Ryan Rickelton breaks Sanath Jayasuriya’s 18-year record for the fastest hundred for MI in IPL history.
But Sanath was the one who set the benchmark. Legend. 🇱🇰🔥 pic.twitter.com/HBVRP1raCu
— Cricwire (@CricWireLK) April 29, 2026
रिकल्टनने या खेळीसह मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. त्याने श्रीलंकेचे दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या याचा २००८ मधील ४५ चेंडूंतील शतकाचा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे, याच हंगामात तिलक वर्मानेही ४५ चेंडूंत शतक झळकावून जयसूर्यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती, पण आता रिकल्टनने सर्वांना मागे टाकले आहे.
डावखुऱ्या फलंदाजांचे वर्चस्व –
Innings Break!
A marathon 1⃣2⃣3⃣*(55) from Ryan Rickelton propels #MI to a huge total 📈🎯
Will #SRH chase it and continue their winning run? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/ypWTkEr2Rc#TATAIPL | #KhelBindaas | #MIvSRH pic.twitter.com/LJb01p5mc8
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2026
या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी शतक झळकावणारा रिकल्टन हा तिसरा फलंदाज ठरला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या वर्षी मुंबईसाठी झालेली तिन्ही शतके ही डावखुऱ्या फलंदाजांनीच (Left-handed batsmen) ठोकली आहेत. रिकल्टनपूर्वी क्विंटन डिकॉक (विरुद्ध पंजाब) आणि तिलक वर्मा (विरुद्ध गुजरात) यांनी शतकी खेळी केली होती. रिकल्टनने विल जॅक्ससोबत ९३ धावांची सलामी देत अवघ्या २३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मुंबईने गेल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात शतके झळकावून आपली फलंदाजीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.





