MI vs SRH : लाइव्ह सामन्यात सूर्याने अभिषेकच्या खिशात घातला हात, अन् पुढे काय झालं? पाहा VIDEO

MI vs SRH Suryakumar Yadav Checks Abhishek Sharma’s Pocket : गुरुवारी मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ४ विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२५ मध्ये तिसरा विजय नोंदवला. सामन्यादरम्यान, भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माचा खिसा तपासताना दिसला. मात्र, त्याला त्यात काहीही सापडले नाही. पण तो त्या षटकात नक्कीच बाद झाला. सूर्यकुमार यादव अभिषेकचा खिसा तपासत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२५ च्या २७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने पंजाब किंग्जविरुद्ध ५५ चेंडूत १४१ धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात शतक झळकावल्याने अभिषेकने त्याच्या खिशातून एक चिट्ठी काढली ज्यावर लिहिले होते, “ऑरेंज आर्मी हे तुमच्यासाठी आहे.” सामन्यानंतर त्याचा साथीदार ट्रॅव्हिस हेडने सांगितले की अभिषेक बराच काळ ही चिट्ठी घेऊन फिरत होता.
सूर्याने अभिषेक शर्माचा खिसा तपासला –
pic.twitter.com/jjE4cpoexd https://t.co/zLCozmFpkf
— 𝘽²⁶⁹ (@mallichudam) April 17, 2025
याच कारणामुळे मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव अभिषेक शर्माचे खिसे तपासताना दिसला. तो मुंबईविरुद्ध खेळण्यासाठी अभिषेक चिट्ठी घेऊन आला आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न करत होता. अभिषेकच्या खिशात काहीही सापडले नाही पण तो त्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला.
हेही वाचा – MI vs SRH : ‘जर फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर…’, पराभवानंतर पॅट कमिन्सचं मोठं वक्तव्य
आठव्या षटकात हार्दिक पंड्याने सलामीवीर अभिषेक शर्माला बाद केले. अभिषेक शर्मा २८ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्याने सात चौकार मारले. पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने १८.१ षटकांत सहा गडी गमावून १६६ धावा करून हंगामातील तिसरा विजय नोंदवला. सनरायझर्स हैदराबाद दोन विजयांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे आणि आता पात्रता फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना उर्वरित सातपैकी सहा सामने जिंकावे लागतील.





