MI vs SRH : विकेटकीपरच्या चुकीची शिक्षा बॉलरला का? वरुण चक्रवर्तीने उपस्थित केला मोठा सवाल

MI vs SRH Varun Chakaravarthy react on no ball in IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ३२ वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ४ विकेट्सनी पराभव केला. या सामन्यादरम्यान, एक विचित्र नो बॉल देण्यात आला, ज्यामुळे आता बराच गोंधळ उडाला आहे. खरंतर, मुंबई इंडियन्सच्या डावात, झीशान अन्सारीच्या गोलंदाजीवर पॅट कमिन्सने रायन रिकल्टनला झेलबाद केले.
काय होतं प्रकरण?
पण जेव्हा चेंडू रिकेल्टनच्या बॅटवर लागला तेव्हा यष्टिरक्षक हेनरिक क्लासेनचे ग्लोव्हज स्टंपच्या पुढे होते. त्यामुळे नो बॉल देण्यात आला. त्यानंतर डगआउटमध्ये परतलेल्या रायन रिकेल्टनला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावण्यात आले. नो बॉलमुळे त्याला फ्री हिटही मिळाला. या नो बॉलवरून खूप गदारोळ सुरू आहे. टीम इंडियाचा आणि केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने या संपूर्ण प्रकरणावर मोठे विधान केले आहे. जे सध्या चर्चेत आहे.
Drama unfolded in the 7th over of #MI's chase when #RyanRickelton was caught by Cummins – but it was a NO-BALL! 🤯
But why was Zeeshan's front-foot legal delivery called a NO-BALL? Former international umpire Anil Chaudhary explains an important law! 🧐#IPLonJioStar 👉… pic.twitter.com/UTMwG2WYdS
— Star Sports (@StarSportsIndia) April 18, 2025
वरुण चक्रवर्ती काय म्हणाला?
If the keeper's gloves come in front of the stumps, it should be a dead ball and a warning to the keeper so that he doesn't do that again !!! Not a no ball and a free hit!! What did the bowler do🙄🙄
Thinking out loud!! What do u all think???— Varun Chakaravarthy🇮🇳 (@chakaravarthy29) April 17, 2025
मिस्ट्री स्पिनर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुण चक्रवर्तीने एक्सवर एक पोस्ट करून या वादग्रस्त नो बॉलवर आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, पंचांनी नो बॉल किंवा फ्री हिटऐवजी तो डेड बॉल घोषित करायला हवा होता. चक्रवर्तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जर विकेटकीपरचे ग्लोव्हज स्टंपसमोर आले, तर तो डेड बॉल असायला हवा आणि विकेटकीपरला इशारा दिला पाहिजे जेणेकरून त्याने पुन्हा असे करू नये. त्यामुळे तो नो बॉल किंवा फ्री हिट दिला जाऊ नये. कारण यामध्ये गोलंदाजाचा काय दोष आहे? तुम्हाला काय वाटतं?’
हेही वाचा – Glenn Maxwell : ‘जर दुसरा कोणी खेळाडू असता तर…’, मॅक्सवेलच्या निष्काळजीपणावर पुजारा संतापला
सामन्याबद्दल बोलायचे, तर गोलंदाजांनंतर फलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे मुंबईने हैदराबादचा चार विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत पाच गडी गमावून १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, मुंबईने १८.१ षटकांत सहा गडी गमावून १६६ धावा करून सामना जिंकला. मुंबईचा हा सात सामन्यांतील तिसरा विजय आहे आणि ते सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत. त्याच वेळी, हैदराबादचा सात सामन्यांमधील चौथा पराभव असून संघ गुणतालिकेत चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे.





