IPL 2024, Mumbai Indians Record : सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये पहिला विजय नोंदवला. मोसमातील चौथ्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विजयाचे खाते उघडले. या विजयासह मुंबईने T20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या विक्रमासह मुंबईने चेन्नई सुपर किंग्ज आणि टीम इंडियालाही मागे टाकले आहे.
खरं तर, आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून, मुंबई इंडियन्सने T20 क्रिकेटमध्ये 150 विजय पूर्ण केले. T20 क्रिकेटच्या इतिहासात हा आकडा गाठणारा मुंबई पहिला संघ ठरला आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा संघ 148 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर टीम इंडिया 144 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
यादीत पुढे जाताना लँकेशायर संघ तिसऱ्या स्थानावर तर समरसेट चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंत लँकेशायरने 143 आणि समरसेटने 142 टी-20 जिंकले आहेत. यादीत आणखी एक स्थान पाहिल्यास पाकिस्तान 139 विजयांसह सहाव्या स्थानावर आहे.
सर्वाधिक T20 सामने जिंकणारे संघ…
150 – मुंबई इंडियन्स
148- चेन्नई सुपर किंग्ज
144 – टीम इंडिया
143 – लँकेशायर(काऊंटी क्रिकेट)
142 – समरसेट(काऊंटी क्रिकेट)
139 – पाकिस्तान
Team India : मोहम्मद शमी कधी करणार पुनरागमन? आयपीएल दरम्यान त्याच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट…
विजयानंतर मुंबईला मिळाला दिलासा…
दरम्यान, मुंबईने गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिले तीन सामने गमावले होते. गुजरातने मुंबईचा 6 धावांनी, हैदराबादने 31 धावांनी तर राजस्थानने 6 गडी राखून पराभव केला आहे.