GT vs LSG : मिचेल मार्शने झळकावले ऐतिहासक शतक! १७ वर्षानंतर केला’हा’ खास पराक्रम

Mitchell Marsh smashed his maiden IPL century : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर मिचेल मार्शचं वादळ पाहायला. मिचेल मार्शने गुजरात टायटन्सविरुद्ध स्फोटक फलंदाजी करत अवघ्या ५६ चेंडूत पहिले आयपीएल शतक झळकावले. या हंगामात शतक करणारा तो पहिला परदेशी फलंदाज ठरला. याआधी, आयपीएल २०२५ मध्ये झळकावलेली सर्व शतके भारतीय खेळाडूंनी केली होती. आज मार्शसमोर गुजरातचा प्रत्येक गोलंदाज असहाय्य दिसत होता. विशेष म्हणजे त्याने रशीद खानच्या फक्त एका षटकात २५ धावांचा पाऊस पाडत संघाला २३५ धावांच डोंगर उभारुन दिला.
मिचेल मार्शने केला कहर –
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मिचेल मार्शने अॅडम मार्करमसह लखनौला शानदार सुरुवात करुन दिली. मार्श आणि मार्करम यांनी पहिल्या विकेटसाठी ९.५ षटकांत ९१ धावा जोडल्या. मार्शने अधिक आक्रमक पद्धतीने खेळताना केवळ २३ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मार्करम ३६ धावांवर बाद झाल्यानंतर मार्शला निकोलस पूरनची चांगली साथ मिळाली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, मार्शने आपली जबरदस्त फलंदाजी सुरू ठेवली आणि ५६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण करताना मार्शने १० चौकार आणि ६ उत्तुंग षटकार मारले.
2008 – Elder brother Shaun Marsh smashed an IPL century.
2025 – Younger brother Mitchell Marsh smashed an IPL century.
MITCHELL AND SHAUN – THE FIRST BROTHERS DUO WITH AN IPL TON. 🥶pic.twitter.com/m8aGSrLXtA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 22, 2025
राशिदच्या षटकात पाडला २५ धावांचा पाऊस –
डावाच्या १२व्या षटकात मिचेल मार्शने राशीद खानची चांगलीच धुलाई केली. राशिदच्या पहिल्याच षटकात मार्शने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. मार्शने षटकाची सुरुवात एका शक्तिशाली षटकाराने केली. यानंतर, त्याने दुसऱ्या चेंडूवर एक चौकार मारला. यानंतर पुन्हा तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला, तर चौथ्या चेंडूवर त्याच्या बॅटमधून आणखी एक चौकार लागला. मार्शने पाचव्या चेंडूवर आणखी एक चौकार मारला आणि त्या षटकात एकूण २५ धावा काढल्या.
हेही वाचा – Arshad Khan : लाइव्ह सामन्यात टळली मोठी दुर्घटना! एकाच षटकात दोनदा घसरुन पडला गोलंदाज, पाहा VIDEO
आयपीएलमध्ये मार्श ब्रदर्सचा ऐतिहासिक पराक्रम –
Shaun and Mitchell Marsh – the FIRST PAIR OF SIBLINGS to score an IPL hundred 🤯🙌 pic.twitter.com/qNe2rOg43B
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 22, 2025
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच शॉन मार्श आणि मिचेल मार्श या दोन सख्या भावांनी शतके ठोकून एक विशेष कामगिरी केली आहे. आयपीएल २००८ च्या हंगामात शॉन मार्शने शतक ठोकून ऑरेंज कॅप जिंकली होती. आता १७ वर्षांनंतर मिचेल मार्शनेही शतक ठोकून हाच पराक्रम पुन्हा केला आहे. अशाप्रकारे, मार्श बंधू आयपीएलमध्ये शतक झळकावणारी पहिली भावा-भावाची जोडी ठरली आहे.





