Arshad Khan : लाइव्ह सामन्यात टळली मोठी दुर्घटना! एकाच षटकात दोनदा घसरुन पडला गोलंदाज, पाहा VIDEO

Arshad Khan slipped twice during his spell : गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात दोनदा मोठा अपघात टळला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गोलंदाजी करताना गुजरातचा वेगवान गोलंदाज अर्शद खानचा पाय दोन वेळा घसरला. दोन्ही वेळा चेंडू टाकण्यापूर्वी त्याचा पाय घसरला आणि तो जोरात जमिनीवर आदळला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाय घसरुन पडल्यानंतर अर्शद काही वेळ जमिनीवर बसून राहिला आणि त्याच्याकडे पाहून असे वाटले की त्याला गंभीर दुखापत झाली आहे. पण त्याला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, यानंतर त्याच षटकात अर्शदसोबत पुन्हा एकदा असाच एक प्रसंग घडला. सुदैवाने, गुजरातच्या या वेगवान गोलंदाजाला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. पण दुसऱ्यांदा घसरुन पडल्यानंतर अर्शद खानला मैदान सोडावे लागले.
गुजरात टाइटंस के बॉलर अरशद खान मैच के दौरान बॉल फकते समय दो बार पीच के फिलसन के कारण गिर पड़े और बाल बाल बचे नही तो injured हो जाते फिलहाल मैच जारी है देखिए कौन टीम जीतती है गुजरात टाइटंस या लखनऊ सुपर जेंट्स #ipl2025 #cricketlovers #ArshadKhan #आईपीएल #LSGvsGT #GTvsLSG pic.twitter.com/Co1lqp8VzZ
— Rohit Rony X (@rohitronyrr) May 22, 2025
अर्शद खान दोनदा थोडक्यात बचावला –
Arshad Khan my goodness pic.twitter.com/VZdiTkEnBo
— cricketvideoz (@cricketvid98507) May 22, 2025
खरं तर, डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी आलेला अर्शद त्याच्या स्पेलचा पहिला चेंडू टाकणारच होता, तेव्हा त्याचा पाय घसरला आणि जोरात जमिनीवर पडला आणि काही वेळ तो उठू शकला नाही. अर्शदकडे पाहून असे वाटत होते की त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. तथापि, फिजिओने तपासणी केल्यानंतर, अर्शदने पुन्हा गोलंदाजी सुरू केली. अर्शदने षटकात फक्त चार चेंडू टाकले होते, तेव्हा पुन्हा एकदा त्याचा पाय घसरला. यानंतर कसं तरी आपलं षटकं पूर्ण करुन तो लगेचच मैदानाबाहेर गेला. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर त्याने पुन्हा गोलंदाजी केली.
हेही वाचा – Suryakumar Yadav : ‘बीवी ने बोला करने का… मतलब करने का’, सूर्याने पत्नीची खास इच्छा केली पूर्ण, पाहा VIDEO
लखनौने गुजरातसमोर २३६ धावांचे लक्ष्य ठेवले –
सामन्याबद्दल बोलायचे तर लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्ससमोर २३६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लखनौच्या डावात मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. मार्शने ६४ चेंडूत ११७ धावांची खेळी केली. तर मार्करम २४ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. निकोलस पूरनने २७ चेंडूत ५६ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार ऋषभ पंतने ६ चेंडूत दोन षटकारांसह १६ धावा केल्या. गुजरातकडून अर्शद खान आणि साई किशोर यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.





