IPL 2024 ( KKR vs SRH Qualifier 1) : हैदराबादचा कोलकाताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय, महत्त्वपूर्ण सामन्यासाठी ‘अशी’ आहे दोन्ही संघांची playing 11…

IPL 2024 ( KKR vs SRH Qualifier 1, Toss Update) : आज आयपीएल 2024 स्पर्धेच्या फायनलच्या तिकिटासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यास संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरूवात होईल. दोन्ही संघांकडे अनेक स्फोटक फलंदाज आहेत, त्यामुळे आज क्रिकेट चाहत्यांना एक उच्च धावसंख्येचा सामना पाहायला मिळेल.
आयपीएल (IPL 2024) चा पहिला क्वालिफायर सामना कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात आहे. हा सामना जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल. पहिला क्वालिफायर गमावणारा संघ एलिमिनेटर सामन्यातील विजेत्यासोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा सनरायझर्स हैदराबाद संघाच्या बाजूनं लागला आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Qualifier 1. Sunrisers Hyderabad Won the Toss & elected to bat) त्यामुळे कोलकाता संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. हैदराबादने या महत्त्वाच्या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि पंजाब किंग्जविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यातील तोच संघ कायम ठेवला आहे. दुसरीकडे, केकेआरनेही प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
Sunrisers Hyderabad elect to bat against Kolkata Knight Riders.
Follow the Match ▶️ https://t.co/U9jiBAl187#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/LXVNHfhhp3
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
KKR vs SRH : दोन्ही संघाचंं Playing 11 खालीलप्रमाणे..
कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. ( इम्पॅक्ट सब : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड)
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी. नटराजन. ( इम्पॅक्ट सब: सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट)
पावसाने व्यत्यय आणल्यास केकेआर अंतिम फेरीत…
प्लेऑफमध्ये फक्त अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. क्वालिफायर-1, क्वालिफायर-2 आणि एलिमिनेटर सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. या सामन्यांमध्ये पाऊस पडल्यास प्रथम किमान पाच षटकांचा सामना घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पाच षटकांचा सामनाही शक्य नसेल तर सुपर ओव्हर होईल. त्याचबरोबर सुपर ओव्हरला वाव नसेल तर गुणतालिकेतील क्रमवारीच्या आधारे निर्णय घेतला जाईल. आणि याचा टेबल टाॅपर केकेआरला फायदा होईल.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील हेड टू हेड रेकाॅर्ड बदल बोलायचे झाले तर दोन्ही संघ आतापर्यंत 26 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये श्रेयस अय्यरचा संघ वरचढ ठरला आहे. केकेआर संघाने हैदराबादविरुद्ध आतापर्यंत 17 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने कोलकाताविरुद्ध केवळ 9 सामने जिंकले आहेत.





