Suryansh Shedge : आईने नोकरी सोडली, आता तो आयपीएलमध्ये मैदान गाजवतोय; कोण आहे पंजाब नवा हिटर सूर्यांश शेडगे?
Suryansh Shedge : नवोदित अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेने पुढे येत संघाचा डाव सावरला आणि एकट्याच्या जोरावर संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

Suryansh Shedge smashed fifty just 24 ball : आयपीएल २०२६ च्या हंगामात गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या पंजाब किंग्सच्या फलंदाजीची ताकद आतापर्यंत सर्वांनीच पाहिली आहे. मात्र, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच पंजाबची फलंदाजी डगमगताना दिसली. अशा बिकट परिस्थितीत संघाच्या २३ वर्षीय नवोदित अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेने पुढे येत संघाचा डाव सावरला आणि एकट्याच्या जोरावर संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
संकटात धावून आला शेडगे –
अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी केली. गुजरातच्या वेगवान गोलंदाजांसमोर पंजाबच्या आघाडीच्या फळीने लोटांगण घातले आणि केवळ ४७ धावांत पंजाबचे ५ फलंदाज तंबूत परतले. त्यानंतर क्रीझवर आलेल्या सूर्यांश शेडगेने संयम आणि आक्रमकतेचे मिश्रण दाखवत शानदार अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
6️⃣6️⃣4️⃣4️⃣6️⃣❗🔥
Suryansh Shedge provided much-needed impetus to Punjab Kings with a fiery fifty! 💥🏏#TATAIPL Revenge Week 2026 ➡️ #GTvPBKS | LIVE NOW 👉 https://t.co/1yVyFdN1Su pic.twitter.com/BzHN1SUA6D
— Star Sports (@StarSportsIndia) May 3, 2026
डावातील १४वे षटक या खेळीचे वैशिष्ट्य ठरले, जेव्हा सूर्यांशने मानव सुतारच्या एकाच षटकात ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने तब्बल २६ धावा कुटल्या. या आक्रमकतेच्या जोरावर त्याने संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. शेवटी सूर्यांशने २९ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. त्याने आपल्या या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकारांची बरसात केली
कोण आहे सूर्यांश शेडगे?
Suryansh Shedge, aged 23, smashes his maiden IPL fifty, skillfully steering the team out of a tough spot at 47-5 👏
.
. #GTvsPBKS #ipl2026 #SuryanshShedge #PBKS #SRH pic.twitter.com/GKOo2QDcoV
— Cric 360 Cricket (@Cric360_Cricket) May 3, 2026
२९ जानेवारी २००३ रोजी मुंबईत जन्मलेला सूर्यांश शेडगे हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या या प्रवासात आईचा मोठा वाटा असून, त्यांनी मुलाच्या स्वप्नासाठी आपली नोकरीही सोडली होती. शालेय स्तरावर गाइल्स शिल्ड स्पर्धेत अवघ्या १३७ चेंडूत नाबाद ३२६ धावांची ऐतिहासिक खेळी करून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
सूर्यांशने मुंबईच्या अंडर-१९ संघाचे नेतृत्वही केले आहे. अभिषेक नायर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या खेळाडूला आयपीएल २०२३ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सने संघात समाविष्ट केले होते. आता २०२६ च्या हंगामात पंजाब किंग्ससाठी मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने आपले अष्टपैलू गुण सिद्ध केले आहेत.





