GT vs PBKS Gujarat Titans won by 4 wickets : आयपीएल २०२६ च्या एका अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर ४ विकेट्सनी विजय मिळवला आहे. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात पंजाबने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना, वॉशिंग्टन सुंदरने पाचव्या चेंडूवर षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. पंजाबची सुरुवात अत्यंत निराशाजनक – नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. डावाच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर प्रियांश आर्य (२) आणि कूपर कोनोली (०) बाद झाल्याने पंजाबने अवघ्या २ धावांत २ विकेट्स गमावल्या. त्यानंतर प्रभसिमरन सिंगने कर्णधार श्रेयस अय्यर (१९) सोबत ३३ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रभसिमरन १५ धावांवर बाद झाल्यानंतर पंजाबची घसरण सुरूच राहिली आणि ४७ धावांत त्यांचे ५ फलंदाज तंबूत परतले. सूर्यांश शेडगेचं अर्धशतक ठरलं व्यर्थ – Innings Break! Jason Holder and other #GT pacers restrict #PBKS to 163/9 😲 Can Punjab Kings defend it? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/9vBsQTIV2x#TATAIPL | #KhelBindaas | #GTvPBKS pic.twitter.com/hlSxvip4O0 — IndianPremierLeague (@IPL) May 3, 2026 अशा कठीण प्रसंगी सूर्यांश शेडगेने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. त्याने मार्कस स्टोइनिससोबत ६व्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ७९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्यांशने २९ चेंडूंत ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची आक्रमक खेळी केली. तर स्टोइनिसने ३१ चेंडूंत ४० धावांची खेळी साकारली. त्यानंतर मार्को यान्सेनने २० धावांचे योगदान दिले. ज्यामुळे पंजाबचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारू शकला. गुजरातकडून जेसन होल्डरने भेदक गोलंदाजी करत २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी २, तर राशिद खानने १ विकेट घेतली. हेही वाचा – Suryansh Shedge : आईने नोकरी सोडली, आता तो आयपीएलमध्ये मैदान गाजवतोय; कोण आहे पंजाब नवा हिटर सूर्यांश शेडगे? साई सुदर्शन झळकावलं अर्धशतक – Continuing his rich run of form ✨ Sai Sudharsan guiding #GT‘s chase with a 3️⃣rd fifty-plus score in his last 4️⃣ innings 🔝 Updates ▶️ https://t.co/9vBsQTIV2x#TATAIPL | #KhelBindaas | #GTvPBKS | @gujarat_titans | @sais_1509 pic.twitter.com/VjjD5S1Uqs — IndianPremierLeague (@IPL) May 3, 2026 प्रत्युत्तरात, गुजरातने दुसऱ्या षटकात कर्णधार शुबमन गिलची (५) विकेट गमावली. त्यानंतर, साई सुदर्शन आणि जोस बटलर (२६) यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत ठेवले. विकेट्स पडत होत्या, पण सुदर्शनने संयम राखला आणि धावसंख्या पुढे नेली. सुदर्शनने या हंगामात चौथ्यांदा ५० धावांचा टप्पा ओलांडला आणि संघाला १२० धावांच्या पुढे नेले. वॉशिंग्टन सुंदरने ठोकला विजयी षटकार – A SIX TO WIN IT!! 😲 A last over thriller and Washington Sundar seals it with a maximum 🔥 Third win in a row for @gujarat_titans 👏💙 Scorecard ▶️ https://t.co/9vBsQTIV2x#TATAIPL | #KhelBindaas | #GTvPBKS pic.twitter.com/2MP5mVedZs — IndianPremierLeague (@IPL) May 3, 2026 पंजाबने सुदर्शनच्या (५७) विकेटसह काही विकेट्स घेऊन पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या टोकावर आपली पकड घट्ट ठेवली. शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना, अर्शद खानने चौकार मारला, तर सुंदरने (४० नाबाद) पाचव्या चेंडूवर षटकार मारून विजय निश्चित केला. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि विजयकुमार वैशाक यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या विजयासह गुजरातने सलग तिसरा विजय मिळवला, तर पंजाबला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागल.