GT vs PBKS : ‘…म्हणून श्रेयसला शतकासाठी स्ट्राईक दिली नाही’; सामन्यानंतर शशांक सिंगचा मो खुलासा, पाहा VIDEO

GT vs PBKS Shashank Singh on Shreyas Iyer missing century : आयपीएल २०२५ च्या ५ व्या सामन्यात, पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर रोमांचक पद्धतीने जबरदस्त विजय मिळवला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या षटकात शशांक सिंगच्या आक्रमक फलंदाजीमुळे श्रेयस अय्यरला त्याचे पहिले आयपीएल शतक हुकले, परंतु नंतर त्याने खुलासा केला की पंजाब किंग्जच्या कर्णधारानेच त्याला त्याच्या शतकाची पर्वा न करता मोठे शॉट्स खेळण्याचा स्पष्ट संदेश दिला होता. पंजाबच्या डावातील २० वे षटक सुरू झाले तेव्हा श्रेयस अय्यर ९७ धावा करून नॉन-स्ट्रायकर एंडवर उभा होता.
मोहम्मद सिराजच्या या षटकात शशांकने सिंगने पाच चौकार मारले, ज्यामुळे अय्यरला फलंदाजीची संधी मिळाली नाही. नाबाद ४४ धावा करणाऱ्या शशांकने सांगितले की, अय्यरने त्याला स्ट्राईक रोटेट करण्यास सांगितले नव्हते. पंजाब किंग्जच्या ११ धावांनी विजयानंतर शशांक म्हणाला, ‘खरं सांगायचं तर मी स्कोअरबोर्डकडे पाहिलं नाही. पण पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर मी स्कोअरबोर्डकडे पाहिलं तर श्रेयस ९७ धावांवर खेळत होता. यानंतर मी काहीच बोललो नाही.
View this post on Instagram
शशांक सिंगकडून श्रेयस अय्यरचं कौतुक –
𝐁𝐚𝐬 𝐉𝐞𝐞𝐭𝐧𝐚 𝐇𝐚𝐢 👊#PunjabKings #IPL2025 #BasJeetnaHai #GTvPBKS pic.twitter.com/3voKnbPH8V
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 26, 2025
शशांक सिंग पुढे म्हणाला, श्रेयस माझ्याकडे आला आणि म्हणाला, शशांक, माझ्या शतकाची काळजी करू नकोस. अर्थात, मी त्याला विचारणार होतो की मी एक धाव घेऊन त्याला स्ट्राइक द्यावी का. परंतु, कर्णधार असून हे सांगण्यासाठी खूप मोठं मन आणि धाडसं लागतं. कारण टी-२० मध्ये, विशेषतः आयपीएलमध्ये शतकं सहजासहजी होतृ नाहीत.’ शशांक म्हणाला की अय्यरचा संदेश स्पष्ट होता की गोलंदाजावर हल्ला करत राहा आणि धावा करत रहा.
हेही वाचा – Boxer Saweety Boora : बॉक्सर स्वीटी बुराकडून पती दीपक हुड्डाला मारहाण, VIDEO होतोय व्हायरल
श्रेयस अजिबात बदललेला नाही –
शंशाक म्हणाला, ‘श्रेयसने मला सांगितलं की जा आणि प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न कर. यामुळे मला आणखी आत्मविश्वास मिळाला. आपल्या सर्वांना माहित आहे की दिवसाच्या शेवटी हा एक सांघिक खेळ आहे, परंतु अशा परिस्थितीत इतके निस्वार्थी राहणं अजूनही कठीण आहे. पण श्रेयस त्यापैकी एक आहे. मी त्याला गेल्या १०-१५ वर्षांपासून ओळखतो. तो अजिबात बदललेला नाही.’





