IPL 2024 (DC vs SRH Match 35) : हेड-अभिषेक नंतर शाहबाजची तूफानी खेळी, हैदराबादने दिल्लीसमोर ठेवलं मोठे लक्ष्य….

IPL 2024, Live Cricket Score (DC vs SRH Match 35) : आज आयपीएल 2024 च्या 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज तुफानी फलंदाजी करत आहेत. आज अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळल्या जात असलेल्या सामन्यात हैदराबादने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करत विरोधी संघ दिल्लीसमोर 267 धावांचे लक्ष्य ठेवले. पॉवर प्लेमध्ये या संघाने 125 धावा ठोकल्या होत्या, जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा पॉवर प्ले स्कोअर ठरला.
Innings Break!
Abhishek Sharma & Travis Head’s superb opening partnership and Shahbaz Ahmed’s maiden IPL fifty power #SRH to 266/7 👏👏
Can #DC go past this mammoth total?
Scorecard ▶️ https://t.co/LZmP9Tevto#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/zD5FgCs2D4
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हैदराबादने केलेली सुरुवात पाहून पंतला नक्कीच पश्चाताप झाला असेल. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. पॉवर प्ले संपल्यानंतर कुलदीप यादवने 46(12) च्या स्कोअरवर अभिषेकला बाद करून दिल्लीसाठी पुनरागमन केले. यानंतर एडन मार्कराम 1 धावा काढून बाद झाला.
ट्रॅव्हिस हेडला 89 धावांवर कुलदीप यादवने बाद केले. हेड 32 चेंडूत 89 धावांवर बाद झाला. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 6 षटकारही मारले. तर अभिषेकने 12 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. हेनरिक क्लासेन 15(08), नितीश रेड्डी 37(27), अब्दुल समद 13(08) आणि पॅट कमिन्स 1 धावांवर बाद झाले. शाहबाज अहमदनेही अप्रतिम फलंदाजी करत 29 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 59 धावा करून नाबाद परतला.
दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. मात्र, या काळात कुलदीप यादवचा यशस्वी स्पेल होता, ज्यात त्याने 4 षटकांत 55 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय मुकेश कुमार आणि अक्षर पटेलही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यशस्वी ठरले. अक्षर पटेलची गोलंदाजी उत्कृष्ट होती, त्याने 4 षटकात 27 धावा देत 1 बळी घेतला. खलील अहमद हा आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे, परंतु त्याने केवळ 3 षटकात 51 धावा दिल्या.





