DC vs SRH : बुलेट शॉटवर जॅक फ्रेझर मॅकगर्कने घेतला अफलातून कॅच, फलंदाजही झाला चकित, पाहा VIDEO

DC vs SRH Jack Fraser Mcgurk take amazing catch of diving in air : आयपीएल २०२५ च्या १० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी उत्कृष्ट होती. गोलंदाजीसोबतच, दिल्ली कॅपिटल्सने क्षेत्ररक्षणातही आपली उत्कृष्टता दाखवली. विशेषतः जॅक फ्रेझर मॅकगर्कने अनिकेत वर्माचा सीमारेषेजवळ घेतलेला झेल अद्भुत होता. सनरायझर्सकडून अनिकेत वर्मा हा एकमेव फलंदाज होता, ज्याने अर्धशतक झळकावले. पण तो कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जॅक फ्रेझर मॅकगर्कने घेतला अप्रतिम झेल –
दिल्ली कॅपिटल्सकडून १६ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या कुलदीप यादवच्या चौथ्या चेंडूवर अनिकेत वर्माने शानदार षटकार मारला मारला होता. त्यानंतर पुढच्या चेंडूवरही अनिकेतने षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी त्याचा प्रयत्न फसला आणि जॅक फ्रेझर मॅकगर्कने सीमारेषेवर त्याचा उत्कृष्ट झेल घेतला. जॅक फ्रेझर मॅकगर्कने सीमारेषेवर हवेत उंच उडी मारली आणि शरीराचा व्यवस्थित समतोल साधत जबरदस्त झेल घेतला. मॅकगर्कचा हा झेल पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहतेही थक्क झाले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलह होत आहे.
Jump. Timing. Perfection. 🔝
An excellent catch from Jake Fraser-McGurk at the ropes brings an end to Aniket Verma's fighting knock! 💙
Updates ▶️ https://t.co/L4vEDKzthJ#TATAIPL | #DCvSRH | @DelhiCapitals pic.twitter.com/7b6eekZtRC
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
अनिकेतने हैदराबादसाठी साकारली ७४ धावांची खेळी –
नाणेफेक जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्याचा निर्णय प्रभावी ठरला नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासून हैदराबादवर पकड घट्ट करण्यास सुरुवात केली. मात्र, अनिकेतने एका टोकापासून संघाचा किल्ला सांभाळला. सनरायझर्सकडून अनिकेत शर्मा ४१ चेंडूत ७४ धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत ६ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता.
हेही वाचा – DC vs SRH : मिचेल स्टार्कने केली कमाल! हैदराबादच्या तब्बल ‘इतक्या’ फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर, मिचेल स्टार्कने दिल्लीसाठी आपली जादू दाखवली. स्टार्कने ३.४ षटकांत ३५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय, कुलदीप यादवने आपल्या फिरकी दाखवत ३ विकेट्स घेतल्या. तर मोहित शर्माने १ विकेट्स घेतली. अशाप्रकारे, सनरायझर्स संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १८.४ षटकांत १६३ धावांवर ऑलआउट झाला.





