DC vs SRH : मिचेल स्टार्कने रचला इतिहास! दिल्ली कॅपिटल्सचा १७ वर्षांचा दुष्काळ संपवला

DC vs SRH Mitchell Starc became 2nd bowler in IPL history to take five wickets : आयपीएल २०२५ चा १०वा सामना विशाखापट्टण येथे खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनसामने आले होते, ज्यामध्ये दिल्लीने सात विकेट्सनी बाजी मारत सलग दुसरा विजय नोंदवला. मात्र हैदराबादला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेत १७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला. यासह त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी इतिहासही रचला.
मिचेल स्टार्कच्या वेगवान आणि स्विंगिंग चेंडूंपुढे हैदराबादच्या फलंदाजांनी पूर्णपणे हार मानली. स्टार्कने इशान किशन आणि नितीश रेड्डी यांना फक्त एकाच षटकात बाद करून हैदराबादचा टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केला, तर ट्रॅव्हिस हेडलाही दिल्लीच्या आक्रमक गोलंदाजावर मात करता आली नाही. स्टार्क त्याच्या दुसऱ्या स्पेलसाठी परतला आणि त्याने आणखी दोन विकेट्स घेतल्या. २२ चेंडूंच्या आपल्या स्पेलमध्ये स्टार्कने हैदराबादच्या फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त केला आणि संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. यासह त्याने एक खास पराक्रम ही केला.
मिचेल स्टार्कने पहिल्यांदाच केला हा पराक्रम –
खरं तर, टी-२० क्रिकेटमध्ये मिचेल स्टार्कने पाच विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. कारण ट्रॅव्हिस हेडच्या कॉलवर धाव घेण्याच्या प्रयत्नात अभिषेक शर्माने आपली विकेट गमावली. त्यानंतर स्टार्कने एसआरएचवर जोरदार हल्ला चढवला, जे अवघ्या ११ धावांवर अभिषेकची विकेट गमावल्यानंतर अडचणीत सापडले होते. स्टार्कने डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इशान किशनला बाद केले. इशानने फक्त २ धावा केल्या.
स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स –
🚨 FIVE WICKET HAUL BY MITCHELL STARC VS SRH. 🚨 pic.twitter.com/vgUboyjaMk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 30, 2025
यानंतर स्टार्कने नितीश कुमार रेड्डीला खाते उघडण्याची संधीही दिली नाही. २५ धावांवर तीन विकेट्स गमावल्यानंतर अडचणीत सापडलेल्या हैदराबादच्या डावाला ट्रॅव्हिस हेड सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, स्टार्कने पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हेडचा डाव संपवला. दुसऱ्या स्पेलमध्ये स्टार्क परतला तेव्हा त्याने विआन मुल्डरला ९ धावांवर बाद केले. यानंतर, हर्षल पटेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. स्टार्कच्या घातक गोलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ १६३ धावांवर गारद झाला.
हेही वाचा – DC vs SRH : दिल्लीने सलग दुसऱ्या सामन्यात तख्त राखलं! तगड्या हैदराबादवर मिळवला विजय, स्टार्क ठरला गेमचेंजर
मिचेल स्टार्कने संपवला दिल्ली १७ वर्षांचा दुष्काळ –
WHAT A BOWLING PERFORMANCE BY STARC. 🫡
He picked wickets in powerplay, he picked wickets in death overs and his bowling (3.4-0-35-5) in batting pitch against SRH.
– Take a bow, Mitchell Starc. 🙇 pic.twitter.com/cJn5vZn0Jz
— Tanuj (@ImTanujSingh) March 30, 2025
मिचेल स्टार्क आयपीएलमध्ये एका सामन्यात पाच विकेट्स घेणारा दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. स्टार्कने १७ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. खरं तर, दिल्ली कॅपिटल्सने शेवटचे पाच विकेट घेण्याचा पराक्रम २००८ मध्ये अमित मिश्राने केला होता. यानंतर, दिल्लीचा कोणताही गोलंदाज इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच विकेट्स घेण्यात यशस्वी झाला नव्हता.





