पुणे – इन्फोसिस कंपनी आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत इन्फोसिस बीयु, यार्डी या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत समीर कुदळे (४-१४) याने केलेल्या सुरेख अष्टपैलू खेळीच्या जोरावर इन्फोसिस बीयू संघाने मर्क्स संघाचा 7गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.
दुसऱ्या सामन्यात सौरभ देवरे नाबाद ७० धावांसह मयूर राठोड (४-२३)याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर यार्डी संघाने दसॉल्ट सिस्टीम संघाचा २१ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. याआधी स्पर्धेचे उदघाटन इन्फोसिस रिक्रिएशनल क्लब, पुणेचे मुख्य अनंत बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इन्फोसिस रिक्रिएशनल क्लब, पुणेच्या कोअर समितीचे सदस्य सुनिल टक्के आदी मान्यवर उपस्थित होते.