India vs England 3rd Test (Cheteshwar Pujara) :- भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा याची कसोटी कारकीर्द आता जवळपास संपूष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी पुजाराची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ती फोल ठरली. लोकेश राहुल दुखापतीतून अद्याप मॅचफिट ठरला नसल्याचे पुजाराला संधी मिळेल असेही वाटत होते परंचू बीसीसीआयने त्याचा संघ निवडीसाठी विचार केला नाही. त्यामुळे आता त्याला कसोटी संघात परत कधी स्थान मिळेल ही शक्यताही संपूष्टात आली आहे. खरेतर यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण धावा करत भारतीय संघाच्या निवड समितीला आपला विचार करायला भाग पाडण्याची पुजाराकडे संधी होती मात्र, त्याला फारशी चमकदार कामगिरीही करता आली नाही. MS Dhoni : खेळावर व संघावर निष्ठा ठेवली तर यश निश्चितच मिळेल – धोनी गेली दोन वर्षे मी सतत मेहनत करत आहे परंतू माझ्या मोठ्या खेळी होत नाहीत. अर्थात त्याचे माझ्यावरही मोठे दडपण होते. परंतू मी प्रामाणीक प्रयत्न केले. आता संघात पुन्हा निवड होणार किंवा नाही याचा विचार करत नसून मिळालेल्या प्रत्येक संधीचा लाभ घेण्याचा मनापासून प्रयत्न करीन. जर त्यात अपयश आले तर पुनरागमन कठीण आहे परंतू मी सध्या कोणत्याच शक्यतांचा विटार करत नाही, असे पुजाराने म्हटले आहे.