लंडन : भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारावर, त्याच्या पत्नी पूजा पुजारा यांनी लिहिलेल्या ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या लायब्ररी येथे करण्यात आले. पुस्तकाच्या लेखिका व चेतेश्वर पुजारा यांच्या पत्नी पूजा म्हणाल्या की, माझ्या दृष्टीकोनातून २०१० ते २०२३ हा चेतेश्वर यांच्यासाठी संघर्षाचा काळ होता. या पुस्तकाच्या माध्यमातून मी त्यांच्या कारकिर्दीतील कामगिरी व त्यांनी त्याकाळात केलेल्या संघर्षाविषयी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्या म्हणाल्या. पुस्तकाच्या औपचारिक प्रकाशनानंतर त्या म्हणाल्या की, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये भारत व इंग्लंड दरञान सुरु असलेल्या तिसर्या दिवशी बेल वाजवणे व याच मैदानावर पुस्तकाची प्रत सादर करणे या दोन्ही गोष्टींसाठी निमंत्रित होणे, हा आमच्या दोघांचाही सन्मान आहे.