IPL 2025 Cheteshwar Pujara criticizes Glenn Maxwell : टीम इंडियाचा स्टार कसोटी खेळाडू चेतेश्वर पुजाराने आयपीएल २०२५ मधील खराब कामगिरीबद्दल ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलवर टीका केली आहे. मॅक्सवेलसाठी हा आयपीएल हंगाम दुःस्वप्न ठरला आहे, गेल्या वर्षी आरसीबी आणि या वर्षी पंजाबकडून खेळत असताना, गेल्या १६ आयपीएल सामन्यांमध्ये तो १०० धावांचा टप्पा गाठू शकलेला नाही. मॅक्सवेल फलंदाजीच्या पद्धतीत फारसा बदल नाही – गेल्या वर्षी, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सहा सामन्यांमध्ये फक्त ३२ धावा केल्या आणि पंजाब किंग्जसाठी चार सामन्यांमध्ये आणखी २१ धावा जोडल्या. मॅक्सवेलची ही निराशाजनक कामगिरी पाहून पुजारा ईएसपीएन क्रिकइन्फो T20 टाइम आउटवर म्हणाला, “त्याच्या फलंदाजीच्या पद्धतीत फारसा बदल झालेला नाही. आयपीएलकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनही बदललेला नाही. असे काही वेळा दिसून आले आहे, जेव्हा तो थोडासा बेफिकीर झाला आहे. तो अजूनही आठ-दहा वर्षांपूर्वीसारखाच आहे.” मॅक्सवेलने आपली कंबर कसण्याची वेळ – चेतेश्वर पुजारा https://twitter.com/anandhumanoj666/status/1913220648190808387 चेतेश्वर पुजारा पुढे म्हणाला, “मी थोडा टीकात्मक बोलत आहे, पण कधी तर अशी वेळ येते, जेव्हा एक खेळाडू म्हणून तुम्हाला जागे होण्याची आवश्यकता असते. त्यामुळे तो मॅक्सवेलने आपली कंबर कसूण चांगली कामगिरी करुण दाखवण्याची वेळ आली आहे, कारण तो दिवस दूर नाही, जेव्हा पंजाब किंग्ज व्यवस्थापनाचा संयम संपेल. तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की तुम्हाला अशा फ्रँचायझीमध्ये खेळण्याची आणि भाग घेण्याची संधी मिळत आहे, जिथे गोष्टी पणाला लागलेल्या असतातआणि कधीकधी खेळाडू निष्काळजी होतो. त्याला काय घडत आहे याची पर्वा नसते. हेही वाचा – MI vs SRH : लाइव्ह सामन्यात सूर्याने अभिषेकच्या खिशात घातला हात, अन् पुढे काय झालं? पाहा VIDEO त्याच्या जागी दुसरा कोणताही खेळाडू असता, तर… – पुजारा पुढे म्हणाला, “मला खात्री आहे की तो चांगली कामगिरी करू इच्छितो, परंतु जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा तुम्हाला फक्त स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्याला तो समतोल शोधावा लागेल, जर त्याच्या जागी दुसरा कोणताही खेळाडू असता, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले असते, परंतु तो मॅक्सवेल असल्यामुळे त्याला संधी मिळत आहे.”