नवी दिल्ली – ऑगस्ट18 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 7.2 अब्ज डॉलरने कमी होऊन 594 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. या आठवड्यात शेअर बाजारात बरीच परकीय गुंतवणूक परत गेली आहे या कारणामुळे भारतीय परकीय चलन साठ्यावर परिणाम झाला असल्याचे समजले जाते.
अमेरिकेत व्याजदर वाढीची शक्यता आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे पतमानांकन कमी झाल्यानंतर डॉलर बळकट झाल्यामुळे बरीच परकीय गुंतवणूक अमेरिकेच्या कर्जरोख्यात गेली असल्यामुळे भारताकडील परकीय चलन कमी साठा कमी झाला असल्याचे काही चलन व्यापाऱ्यांनी सांगितले.
या अगोदरच्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठा एक अब्ज डॉलरने वाढला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये भारताकडे 645 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा होता. त्यानंतर या साठ्यामध्ये घट होत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर जास्तीत जास्त देशाबरोबर डॉलरच्या माध्यमातून व्यापार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.