Paris Paralympics 2024 : भारताचे सर्वात यशस्वी 24 तास, ऐतिहासिक कामगिरीसह एका दिवसात जिंकली 8 पदके…

Paris Paralympics 2024 (India Record) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये, भारतीय पॅरा ॲथलीट्सनी 24 तासांत म्हणजे एका दिवसात जास्तीत जास्त पदके जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी हा इतिहास पाचव्या दिवशी (02 सप्टेंबर, सोमवार) रचला. सोमवारी भारताच्या खात्यात एकूण 8 पदके आली. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एका दिवसात 5 पदके जिंकली होती. त्यावेळी सुमित अंतिलने टोकियोत भालाफेकीत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले होते आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये 8 पदकांच्या दिवशीही सुमितनेही भारतासाठी सुवर्ण जिंकले आहे.
भारताने सोमवारी 2 सुवर्ण पदकांसह 3 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली. अशा प्रकारे भारतीय खेळाडूंनी 2 सप्टेंबर 2024 संस्मरणीय बनवला. चला तर मग जाणून घेऊया… पाचव्या दिवशी कोणत्या खेळाडूंन कोणत्या खेळात पदक जिंकले.
Paris Paralympics 2024 : भारताच्या नितेश कुमारचा ‘गोल्डन स्मॅश’; बॅडमिंटनमध्ये पटकावलं सुवर्णपदक…
1- योगेश कथुनिया : योगेश कथुनियाने डिस्कस थ्रोच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान मिळवून रौप्य पदक जिंकले. पाचव्या दिवशी भारताचे हे पहिले पदक ठरले.
2 – नितेश कुमार : नितेशने बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 मध्ये सुवर्णपदक जिंकले. नितीशने ब्रिटनच्या बेटेलचा 21-14 18-21 23-2 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
3- तुलसीमाथी मुरुगेसन : तुलसीमाथी मुरुगेसनने बॅडमिंटन महिला एकेरी SU5 मध्ये रौप्य पदक जिंकले. अंतिम सामन्यात तिला 21-17, 21-10 ने पराभवाचा सामना करावा लागला.
Paris Paralympics 2024 : सुमित अंतिलने रचला इतिहास, पॅरालिम्पिक विक्रमासह मिळवलं सुवर्णयश….
4 – मनीषा रामदास : मनीषा रामदासने बॅडमिंटन महिला एकेरी SU5 मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले. तिने कांस्यपदकाच्या लढतीत डेन्मार्कच्या कॅथरीन रोसेन्ग्रेनचा 21-12, 21-8 असा पराभव केला.
5. सुहास यथीराज : सुहास यथीराजला बॅडमिंटन पुरुष एकेरी SL4 च्या अंतिम सामन्यात लुकास मजूरकडून 21-9, 21-13 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागले.
6. राकेश कुमार आणि शीतल देवी : या भारतीय जोडीने तिरंदाजीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. मिश्र सांघिक कंपाऊंडच्या कांस्यपदकाच्या लढतीत राकेश आणि शीतल देवी या जोडीने इलेनोरा सरती आणि मॅटेओ बोनासिना या इटालियन जोडीचा 156-155 असा पराभव केला.
7. सुमित अंतिल : पुरुषांच्या भालाफेक F64 च्या अंतिम फेरीत सुमित अंतिलने सुवर्णपदक जिंकले. सुमितने 70.59 मीटर फेक करून विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
8. नित्य श्री सुमती सिवन : हिने बॅडमिंटन महिला एकेरी SH6 मध्ये कांस्य पदक जिंकले. तिने कांस्यपदकाच्या लढतीत इंडोनेशियाच्या रीना मर्लिनाचा 21-14, 21-06 असा पराभव केला.
Paris Paralympics 2024 : भारताची युवा शटलर ‘नित्या सिवन’ची कांस्यपदकाला गवसणी….
आतापर्यंत 15 पदके…
वास्तविक पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे वर्चस्व कायम आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 15 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 7 कांस्यपदकांचा समावेश आहे. 15 पैकी 8 पदके पाचव्या दिवशीच आली आहेत. ज्यात सुवर्णपदकाचा समावेश आहे. दरम्यान, भारतीय संघाने तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 5 सुवर्णांसह 19 पदके जिंकली होती.
भारत 15 व्या स्थानावर
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या पदकतालिकेत भारत 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी तीन खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकली आहेत. अवनी लेखरा हिने नेमबाजीत, नितीश कुमारने बॅडमिंटनमध्ये आणि सुमित अंतिलने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या पदकतालिकेत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत (शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत) एकूण 92 पदके जिंकली असून त्यात 45 सुवर्णांचा समावेश आहे. ग्रेट ब्रिटन 29 सुवर्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यूएसए 15 सुवर्ण जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे.
#ParisParalympics2024 Medal Tally#TeamIndia🇮🇳 are in 15th position, on the back of a stupendous showing on Day 5.
After the conclusion of day 5, India lie in the 15th position with 3 🥇, 5 🥈and 7 🥉.#Cheer4Bharat and celebrate the contingent’s achievements at the… pic.twitter.com/625PA24U4e
— SAI Media (@Media_SAI) September 2, 2024
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : भारताचे पदक विजेते…. (दि. 3 सप्टेंबर 2024, वेळ 6.00 P.M)
1. अवनी लेखरा : सुवर्णपदक : नेमबाजी (10 मी. एअर रायफल)
2. मोना अग्रवाल : कांस्यपदक : नेमबाजी (10 मी. एअर रायफल)
3. प्रीती पाल : कांस्यपदक : ॲथलेटिक्स (100 मी. शर्यत)
4. मनीष नरवाल : रौप्य पदक : नेमबाजी (10 मी. एअर पिस्तूल)
5. रुबिना फ्रान्सिस : कांस्य पदक : नेमबाजी (10 मी. एअर पिस्तूल)
6. प्रीती पाल : कांस्यपदक : ॲथलेटिक्स (200 मी. शर्यत)
7. निषाद कुमार : रौप्य पदक : ॲथलेटिक्स(उंच उडी)
8. योगेश कथुनिया : रौप्य पदक : ॲथलेटिक्स (डिस्कस थ्रो)
9. नितीश कुमार : सुवर्ण पदक : बॅडमिंटन
10. मनीषा रामदास : कांस्यपदक : बॅडमिंटन
11. तुलसीमती मुरुगेसन : रौप्य पदक : बॅडमिंटन
12. सुहास एलवाय : रौप्य पदक : बॅडमिंटन
13. राकेश कुमार/शीतल देवी : कांस्य पदक : तिरंदाजी
14. सुमित अंतिल: सुवर्णपदक : ॲथलेटिक्स(भालाफेक)
15. नित्या श्री सिवन : कांस्य पदक : बॅडमिंटन





