Paris Paralympics 2024 : सुमित अंतिलने रचला इतिहास, पॅरालिम्पिक विक्रमासह मिळवलं सुवर्णयश….

Paris Paralympics 2024 (Men’s Javelin Throw F64 Final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची स्फोटक कामगिरी कायम आहे. आता सुमित अंतिलने पुरुषांच्या भालाफेक (F64 श्रेणी) मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. सुमितच्या सुवर्णपदकासह सध्याच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या 14 झाली आहे.
सुमितने दुसऱ्या प्रयत्नात 70.59 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावलं आहे. सुमित अंतिलचा हा थ्रो पॅरालिम्पिक खेळांच्या (F64 श्रेणी) इतिहासातील सर्वोत्तम थ्रो होता. याआधी त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक पटकावले होते. तो गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. सुमित अंतिल हा पॅरालिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यादा सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे.
सुमित अंतिलची अंतिम फेरीतील कामगिरी :
पहिला थ्रा – 69.11 मी.
दुसरा थ्रो- 70.59 मी.*
तिसरा थ्रो- 66.66 मी.
चौथा थ्रो-फाऊल
पाचवा थ्रो- 69.04 मी.
सहावा थ्रो – 66.57 मी.
Sumit 🐐-il!#ParaAthletics: Men’s Javelin Throw F64 Final
Gold in Tokyo, Gold in Paris! 🥇🥇
Sumit Antil can’t stop breaking records as he breaches the Paralympics record 3 times en route to a second successive gold. 🤩🤩
He wins with a best throw of 70.59 metres at the… pic.twitter.com/6IJpPYQCdg
— SAI Media (@Media_SAI) September 2, 2024
सुमितने पहिल्या थ्रोमध्येच अप्रतिम कामगिरी केली. त्याने पहिल्या थ्रोमध्ये 69.71 मीटर फेक करून स्वतःचाच विक्रम मोडला. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 68.55 मीटर भालाफेक केली होती. जो पॅरालिम्पिकमधील एक विक्रम होता. सुमित इथेच थांबला नाही, त्याने पुन्हा एकदा दुसऱ्या थ्रोमध्ये स्वतःचाच विक्रम मोडला, यावेळी त्याने 70.59 मीटर फेक करून इतिहास रचला.
या स्पर्धेत श्रीलंकेच्या दुलन कोडिथुवाक्कू (67.03 मीटर) याने रौप्य आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल बुरियन (64.89मीटर) याने कांस्यपदक जिंकले. भारताचा संदीप चौधरी (62.80 मीटर) चौथ्या स्थानावर राहिला तर संदीप संजय सातव्या स्थानावर राहिला. त्याने 58.03 मीटर फेक केली होती.





