Paris Paralympics 2024 : पंतप्रधान मोदींच्या भेटीने पॅरा-ॲथलीट भारावले, पदक विजेत्यांना दिल्या शुभेच्छा…

Paris Paralympics 2024 :- पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरीसह एकूण 29 पदके जिंकली आहेत. तसेच आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 8 सप्टेंबरला संपली आणि सर्व खेळाडू मायदेशी परतले आहेत. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान निवासस्थानी खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधला तर खेळाडूंनीही स्पर्धेतील अनुभव त्यांच्यासोबत शेअर केले.
या भेटीचा व्हिडियो क्रीडा मंत्रालयाने शेयर केला असून या 43 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान पॅरालिम्पियन पदक विजेत्यांचे अभिनंदन करताना आणि त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. या संभाषणात क्रीडा मंत्री मनसुख मांडविया आणि पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाचे (पीसीआय) प्रमुख देवेंद्र झझाडिया देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना खेळाडू भारावले असल्याचे दिसून आले.
संघर्ष, समर्पण और सफलता के प्रतीक 🇮🇳
प्रधानमंत्री @narendramodi जी ने आज अपने निवास पर पेरिस ओलंपिक में भारत का ध्वज लहराने वाले पैरा खिलाड़ियों से मुलाकात की। pic.twitter.com/qEU58GiUMO
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 12, 2024
महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) स्पर्धेत सलग दुसरे पॅरालिम्पिक सुवर्ण जिंकणारी नेमबाज अवनी लेखरा आणि नेत्रहीन ज्युडो खेळाडू कपिल परमार, पॅरालिम्पिक पदक जिंकणारा भारताचा पहिला ज्युडो खेळाडू, पंतप्रधानांसोबत फोटो काढताना दिसणाऱ्यांपैकी एक होते.
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का स्नेह और सादगी pic.twitter.com/CKIX44aQQl
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 12, 2024
मायदेशी परतल्यानंतर पॅरालिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना केंद्र सरकारच्या वतीने बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सुवर्णपदक विजेत्यांना 75 लाख, रौप्य पदक विजेत्यांना 50 तर कांस्यपदक विजेत्यांना 30 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. राकेश कुमारसह कांस्यपदक जिंकणारी हातहीन तिरंदाज शीतल देवी यासारख्या मिश्र सांघिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 22.5 लाख रुपये मिळाले.
यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का पैरा खिलाड़ियो के साथ सीधा संवाद। pic.twitter.com/61KdYDKulv
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 12, 2024
पॅरालिम्पियन सोनल पटेल म्हणाल्या, आज पीएम मोदींशी बोलून खूप आनंद झाला. यावेळी मी पदक जिंकू शकले नाही परंतु, पीएम मोदींशी बोलल्यानंतर आम्ही खूप प्रेरित झालो आहे. पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणे हीदेखील मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कठोर परिश्रम करू आणि पुढील वेळी पदक जिंकण्याची खात्री करू.
तुमची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करा
तुम्ही जिंका किंवा पराभूत व्हा, हे महत्वाचे नाही. यापेक्षा तुम्ही खेळताना तुमची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करा, मनावर कोणतेही दडपण ना ठेवता तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आम्हाला सांगितले होते, असे भारताची 10 मीटर एअर रायफलमध्ये दोन सुवर्णपदक मिळविणारी नेमबाज अवनी लेखाराने बोलताना सांगितले.
Asian Champions Trophy 2024 : हॉकी इंडियाचा विजयी चौकार, दक्षिण कोरियला चारली पराभवाची धूळ…
मला पंतप्रधानांना भेटायचे होते…
महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेती मोना अग्रवाल म्हणाली, आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ते आमच्याशी वैयक्तिकरित्या बोलले. मला नेहमीच पंतप्रधान मोदींना प्रत्यक्ष भेटायचे होते आणि आता ही संधी मिळाली. त्यांनी माझ्या मुलांबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल विचारणा केली. देशाच्या पंतप्रधानांना देखील आमच्या कुटुंबांविषयी माहिती आहे, हे पाहून चांगले वाटले.





