India ODI Squad : ‘BCCI’ला लाज वाटायला हवी! शतकवीर ऋतुराजसह ‘या’ ४ बड्या खेळाडूंना डावलल्याने चाहते संतापले

Fan angry on BCCI for India ODI Squad : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होताच वादाला तोंड फुटले आहे. निवड समितीने काही धक्कादायक निर्णय घेत फॉर्मात असलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेषतः दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघात स्थान न मिळाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी बीसीसीआयवर (BCCI) प्रश्नांचा भडिमार केला आहे.
ऋतुराज गायकवाडची चूक काय?
ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रायपूर वनडे सामन्यात १०५ धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर विशाखापट्टणम वनडेमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि आता थेट त्याला संघातूनच वगळण्यात आले आहे. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे, तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही ऋतुराज जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तराखंडविरुद्ध १२४ धावा आणि मुंबईविरुद्ध ६६ धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याला डावलल्याने चाहते संताप व्यक्त करत आहेत.
निवडीच्या दिवशी शतक ठोकूनही ‘या’ खेळाडूंना स्थान नाही –
SHAME ON YOU, Why is Sanju Samson not in the ODI squad?
Did you see his century today in the Vijay Hazare Trophy?
He deserves a place in the team more than Shubman Gill right now.— Mention Cricket (@MentionCricket) January 3, 2026
निवड समितीने केवळ ऋतुराजलाच नव्हे, तर इतर चार महत्त्वाच्या खेळाडूंनाही संधी नाकारली आहे:
- अक्षर पटेल: ज्या दिवशी भारतीय संघाची निवड झाली, त्याच दिवशी अक्षरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार शतक झळकावले, तरीही त्याला संघात स्थान मिळाले नाही.
- तिलक वर्मा: दक्षिण आफ्रिकेत टी-२० मध्ये चमकलेल्या तिलक वर्मानेही निवडीच्या दिवशी शतक ठोकले, मात्र त्यालाही वनडे संघातून वगळण्यात आले आहे.
- संजू सॅमसन: चाहत्यांचा लाडका संजू सॅमसन यानेही शतकी खेळी करून आपली दावेदारी ठोकली होती, पण त्याच्या नावाचा विचार झाला नाही.
- मोहम्मद शमी: अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या मालिकेत पुनरागमन करेल अशा चर्चा होत्या, मात्र त्या केवळ अफवा ठरल्या असून त्यालाही संघात स्थान मिळालेले नाही.
हेही वाचा – Hardik Pandya Excluded : हार्दिक पंड्याला भारतीय वनडे संघातून का डावललं? बीसीसीआयने सांगितलं मोठं कारण
सोशल मीडियावर टीकेची झोड –
Favouritism of highest order, Gaikwad dropped after scoring 100 in his last ODI.
— Rajiv (@Rajiv1841) January 3, 2026
Where is Mohammed Shami??? Why are you guys doing injustice to him? pic.twitter.com/SQWsUlVOlR
— Kusha Sharma (@Kushacritic) January 3, 2026
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे क्रिकेट प्रेमी प्रचंड नाराज आहेत. “चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान का मिळत नाही?” असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. अनेक चाहत्यांनी बोर्डाला ‘पक्षपाती’ म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा.





