Waqar Younis Statement : ‘भारताविरुद्ध खेळल्याशिवाय पाकिस्तान क्रिकेट सुधारणार नाही!’, वकार युनिसचे खळबळजनक विधान; पाक बोर्डाचे डोळे उघडले
Waqar Younis Statement : वकार युनिसच्या मते, भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियमित द्विपक्षीय मालिकांचा अभाव आणि कमी कसोटी क्रिकेट खेळले जात असल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचा दर्जा सातत्याने घसरत आहे.

Waqar Younis Statement Regular India Pakistan Cricket Bilateral Series : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक लढत जगप्रसिद्ध आहे. मात्र, राजकीय तणावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमधील सामने केवळ आयसीसी आणि एसीसी स्पर्धांपुरतेच मर्यादित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वकार युनिसने मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही देशांमध्ये नियमितपणे द्विपक्षीय सामने खेळवले जावेत, कारण सामने कमी झाल्याने खेळाडूंना मोठ्या दबावाखाली स्वतःला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळत नसल्याचे मत त्याने मांडले आहे.
दोन-तीन वर्षांतून एक मॅच खेळणे पुरेसे नाही –
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये दिलखुलास चर्चा करताना वकार युनिसने भारत-पाक क्रिकेटवर आपले स्पष्ट मत मांडले. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही दोन किंवा तीन वर्षांतून केवळ एकच सामना खेळता, तेव्हा तुम्हाला सर्वोत्तम खेळाडूंचा सर्वश्रेष्ठ खेळ पाहायला मिळत नाही.” वकारच्या मते, भारतीय संघाविरुद्ध सातत्याने खेळल्याने पाकिस्तानी खेळाडूंची मानसिक क्षमता उंचावते आणि त्यांना हाय-व्होल्टेज सामन्यांमधील कठीण दबाव सहन करण्याची सवय होते, जी सध्याच्या खेळाडूंमध्ये दिसत नाही.
चांगल्या खेळाडूंचा दुष्काळ; कसोटी क्रिकेट कमी झाल्याचा फटका
🚨 WAQAR YOUNIS CHANGES IN PAKISTAN CRICKET!! 🔥
Q : “Waqar bhai, when we look at the future of Pakistan cricket, what changes do you think are most important right now?”
Waqar Younis 🗣️: “I think we need to separate white-ball and red-ball cricket, and give players proper roles and stability.”
“It takes time to fix things, and critics need to be patient because it is a work in progress.”
— M Farhan (@MFarhan1200) October 29, 2026
इम्रान खान, वसीम अक्रम, इंझमाम-उल-हक आणि शोएब अख्तर यांसारखे दिग्गज देणाऱ्या पाकिस्तान क्रिकेटचा दर्जा गेल्या काही दशकांत खालावला आहे. या घसरणीचे मुख्य कारण स्पष्ट करताना वकार म्हणाला की, पाकिस्तान आता खूप कमी कसोटी क्रिकेट खेळत आहे. दीर्घकालीन फॉरमॅटकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पूर्वीसारखे तंत्रशुद्ध आणि जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होणे जवळपास बंद झाले आहे.
भारताशी खेळल्यासच पाकिस्तान क्रिकेट सुधारेल; २०१२-१३ नंतर मालिका नाही
Watch Rapid Fire With Waqar Younis…This Or That 🏏
He Did Justice To His Cricketing Knowledge👌 https://t.co/OQGnROIJCw
— Khan (@Khanmohammed12) October 30, 2026
वकारच्या मते, भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध वारंवार हाय-प्रोफाइल सामने खेळल्यास पाकिस्तान क्रिकेटमधील अनेक समस्यांवर तोडगा निघू शकतो. भारताकडून मिळणारे कडवे आव्हान पाकिस्तानी खेळाडूंना अधिक परिपक्व करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२-१३ मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळवली गेली होती. जर या कोंडीवर मार्ग निघाला, तरच पाकिस्तान क्रिकेट आपले जुने वैभव पुन्हा मिळवू शकेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.





