वॉशिंग्टन- लबाडी, कपट आपल्या स्वभावात नाही. आपण फसवले जाऊ शकतो, मात्र कोणाला फसवणार नाही हा संदेश जगाला गेला पाहिजे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. चार दिवसांच्या अमेरिका भेटीवर आलेल्या राजनाथ सिंह यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याशी चर्चेसाठी अमेरिका भेटीवर आलेल्या राजनाथ यांनी भारतीयांशी बोलताना वसुधैव कुटुम्बकमचा संदेश दिला. भारतीयांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करावे. तुम्ही भारताप्रति समर्पित राहीले पाहिजे, मात्र तुम्ही येथे अमेरिकेत काम करत असल्यामुळे या देशाप्रती तुमच्या समर्पणाबाबतही प्रश्न उपस्थित व्हायला नकोत.
तरच भारतीयांबद्दल चांगला समज राहील. भारत जगातील सर्व जाती आणि धर्मांना एक कुटुंब मानतो. भारत आणि अमेरिकेचे संबंधही नियतीपेक्षा कमी नाही. क्रिस्टोफर कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी निघाला होता. मात्र ते अमेरिकेला पोहोचला असे नमूद या दोन्ही देशांचे संबंध खूप पूर्वीपासून असल्याचे राजनाथ म्हणाले.
भारत कधी कोणाच्या पाठीत खंजीर खूपसू शकत नाही कारण भारताने जगाला वसुधैव कुटुम्बकमचा संदेश दिला आहे. त्यामुळे येथे काम करत असलेल्या सर्व भारतीयांनी अत्यंत प्रामाणिकपणेच काम करावे असे राजनाथ म्हणाले.