Police Transfers : मोठी बातमी! महाराष्ट्र पोलिस दलात मोठे फेरबदल; 43 अधिकारी बदलले, पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Police Transfers : महाराष्ट्र पोलिस दलातील 43 उपविभागीय पोलिस अधिकारी आणि सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई, नागपूरसह विविध ठिकाणी नव्या नियुक्त्या.
Updated On:

Maharashtra Police Transfers : महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 43 उपविभागीय पोलिस अधिकारी आणि सहायक पोलिस आयुक्तांच्या बदली व पदस्थापनेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या असून, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, बीड, गडचिरोली, रायगड, नाशिक आणि अमरावतीसह विविध ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
काही अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर नवीन जबाबदारी देण्यात आली असून, काहींची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे.









