IND vs ENG : ‘तो पत्रकार दिसत नाहीये, कुठेय?’, सामन्यापूर्वी भारताची थट्टा करणाऱ्या इंग्लिश पत्रकाराची गिलने घेतली फिरकी, पाहा VIDEO

Shubman Gill’s Epic Response to English Journalist : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना टीम इंडियाने ३३६ धावांनी जिंकला. यामुळे मालिका आता १-१ अशी बरोबरीत आली आहे. या विजयासह टीम इंडियाने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर इतिहास रचला. भारताने या मैदानावर प्रथमच विजय मिळवला. यापूर्वी भारताचा या मैदानावरील रेकॉर्ड अत्यंत खराब होता. ज्यामुळे दुसऱ्या सामन्यापूर्वी इंग्लिश पत्रकाराने थट्टा केली होती, आता सामना जिंकल्यानंतर गिलने त्याला डिवचले.
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने यापूर्वी एजबॅस्टन येथे एकूण ७ सामने खेळले होते, ज्यापैकी ६ सामन्यांत पराभव झाला होता, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. सामन्यापूर्वी एका इंग्लिश पत्रकाराने कर्णधार शुबमन गिलच्या उपस्थितीत या खराब रेकॉर्डची थट्टा केली होती. आता बर्मिंगहॅमच्या ऐतिहासिक विजयानंतर शुबमन गिलने त्या इंग्लिश पत्रकाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
शुबमन गिलने इंग्लिश पत्रकाराची घेतली फिरकी –
#WATCH | Birmingham, England: Team India skipper Shubman Gill says, “…I believe this is the best Indian team to be able to come here in England and we have the capability to beat them, to win the series from here. We have the right momentum with us. If we keep making the right… pic.twitter.com/VOSRvZjzTE
— ANI (@ANI) July 6, 2025
दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार शुबमन गिल पत्रकार परिषदेसाठी गेले. यावेळी त्यानी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्कृष्ट शैलीत उत्तरे दिली. दरम्यान, गिलने त्या इंग्रजी पत्रकाराचा शोध घेण्यास सुरुवात केली, ज्याने दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाच्या खराब रेकॉर्डची थट्टा केली होती. जेव्हा गिलला तो पत्रकार दिसला नाही, तेव्हा त्यानी तिथे उपस्थित असलेल्या इतर पत्रकारांना विचारले, “मला माझा आवडता पत्रकार दिसत नाहीये. तो कुठे आहे?”
हेही वाचा – IND vs ENG : एक बिहारी इंग्लंडवर पडला भारी! आकाश दीपने १० विकेट्स घेत रचला नवा इतिहास
आमच्याकडे त्यांना पराभूत करण्याची क्षमता – शुबमन गिल
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुबमन गिलने सांगितले, “मी कसोटी सामन्यापूर्वी सांगितले होते की, मी आकडेवारी आणि इतिहासावर विश्वास ठेवत नाही. गेल्या ५०-६० वर्षांत आम्ही येथे विविध संघांसोबत ७ सामने खेळलो आहोत. मला वाटते, ही इंग्लंड दौऱ्यावर आलेली भारताची सर्वोत्तम टीम आहे.” त्याने पुढे पत्रकार परिषदेत उपस्थित नसलेल्या आपल्या आवडत्या पत्रकाराबद्दल विचारले, “मला माझा आवडता पत्रकार दिसत नाहीये, तो कुठे आहे?”
हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडियाने रचला इतिहास! एजबॅस्टनमध्ये ५८ वर्षानंतर पहिल्यांदाच फडकवला विजयाचा झेंडा
शुबमन गिलने पुढे भारतीय संघाच्या क्षमतेबद्दल बोलताना सांगितले की, “या मालिकेत विजय मिळवण्यासाठी आमच्याकडे त्याना पराभूत करण्याची क्षमता आहे. आम्हाला चांगली गती मिळाली आहे. जर आम्ही यापुढे योग्य निर्णय घेतले आणि चांगली झुंज दिली, तर ही मालिका अविस्मरणीय ठरेल.” या कसोटी सामन्यात गिलने दोन्ही डावांमध्ये शतके झळकावत एकूण ४३६ धावा केल्या आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा कसोटी सामना १० जुलैपासून लीड्स येथे खेळला जाईल.





