IND vs ENG : टीम इंडियाने रचला इतिहास! एजबॅस्टनमध्ये ५८ वर्षानंतर पहिल्यांदाच फडकवला विजयाचा झेंडा

IND vs ENG Team India Historic Win : भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ३३६ धावांनी जिंकून इतिहास रचला आहे. हा सामना बर्मिंघम येथील एजबॅस्टन मैदानावर खेळला गेला. भारताने प्रथमच या मैदानावर कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी भारतीय संघाला या मैदानावर सात सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, तर एक सामना अनिर्णित राहिला होता.
भारतीय संघाने ५८ वर्षांनंतर असा पराक्रम केला आहे. भारताने एजबेस्टनवर पहिला कसोटी सामना १९६७ मध्ये खेळला होता, परंतु तेव्हापासून एकही विजय मिळवता आला नव्हता. या सामन्यातील विजयाने हा विक्रमही मोडला गेला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या विजयात कर्णधार गिलसह सिराज आणि आकाश दीपने महत्त्वाची भूमिका बजावली.
A historic win at Edgbaston 🙌#TeamIndia win the second Test by 336 runs and level the series 1-1 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF #ENGvIND pic.twitter.com/UsjmXFspBE
— BCCI (@BCCI) July 6, 2025
पहिल्या डावात कर्णधार गिलने झळकावले द्विशतक –
2️⃣6️⃣9️⃣ runs in the 1st Innings
1️⃣6️⃣1️⃣ runs in the 2nd InningsFor his phenomenal batting and record breaking innings in the second Test, Captain Shubman Gill is the Player of the Match 👏
Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF #TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/vjmdn7xce8
— BCCI (@BCCI) July 6, 2025
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५८७ धावा केल्या. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने पहिल्या डावात २६९ धावा केल्या. यादरम्यान गिलने ३० चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्याशिवाय यशस्वी जयस्वालने ८७, रवींद्र जडेजा यांनी ८९, वॉशिंग्टन सुंदर यांनी ४२ आणि करुण नायर यांनी ३१ धावा केल्या. इंग्लंडकडून शोएब बशीरने ३, ख्रिस वोक्स यांनी २ आणि जोश टंगने २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – IND vs ENG : ‘बॅझबॉल सोडा अन्…’, भारताचा ऐतिहासिक विजय रोखण्यासाठी वॉनने इंग्लंडला सांगितला फॉर्म्युला
सिराजने घेतल्या सर्वाधिक ६ विकेट्स –
पहिल्या डावात इंग्लंडला ४०७ धावांवर रोखण्यात आले. पहिल्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, त्यानंतरही इंग्लंडने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या. यादरम्यान जेमी स्मिथने १८४ धावांची नाबाद खेळी केली. हॅरी ब्रुकने १५८ धावांची खेळी केली. या खेळीत इंग्लंडचे ६ फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. भारतीय संघाला पहिल्या डावात १८० धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात भारताकडून गोलंदाजी करताना सिराजने ६ विकेट्स आणि आकाश दीपने ४ विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावातही गिलची ताकद दिसून आली.
दुसऱ्या डावात भारतीय संघाने ६ गडी गमावून ४२७ धावा केल्यानंतर डाव घोषित केला. या डावात शुभमन गिलने पुन्हा एकदा विक्रमी खेळी केली. गिलने १६१ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय पंतने ६५, जडेजाने ६९, केएल राहुलने ५५ धावा केल्या. पहिल्या डावात १८० धावांची आघाडी घेत भारताचा एकूण धावसंख्या ६०७ धावांवर पोहोचला. इंग्लंडकडून शोएब बशीरने २ आणि जोश टँगने २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – IND vs ENG : यशस्वी जैस्वालने जिंकली मनं! १२ वर्षीय दृष्टिहीन चाहत्याला दिली खास भेट, पाहा VIDEO
आकाश दीपने केला कहर –





