IND vs ENG : जैस्वालच्या चुकीमुळे टीम इंडिया अडचणीत, गावस्करांनी सुनावले खडेबोल!

IND vs ENG Sunil Gavaskar on Yashasvi Jaiswal : हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडसमोर एकूण ४१७ धावांचा डोंगर उभा केला. या डावात भारताच्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी साकारली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने १०१ धावांची खणखणीत खेळी केली. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि ऋषभ पंतने पण शतक झळकावले. त्यामुळे भारताला ४७१ धावांचा डोंगर उभारता आला. मात्र, क्षेत्ररक्षण करताना टीम इंडियासह जैस्वालने केलेल्या चुकांवर सुनील गावस्करांनी संताप व्यक्त केला आहे.
भारतीय संघानंतर इंग्लंड संघानेही उत्कृष्ट फलंदाजी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात तीन गडी गमावले होते, तर संघाची धावसंख्या २०९ पर्यंत पोहोचली होती. यावेळी ऑली पोपने नाबाद शतक झळकावले, तर बेन डकेटने ६२ धावांची खेळी केली साकारली. गोलंदाजीच्या वेळी भारतीय संघासाठी स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामी फलंदाज झॅक क्रॉलीला बाद केले. मात्र, त्यानंतरच्या ९ षटकांत भारतीय संघाने तीन विकेट्स घेण्याच्या संधी गमावल्या.
सुनील गावस्कर इंडियाच्या क्षेत्ररक्षणावर संतापले –
Sunil Gavaskar wasn’t pleased with India’s shoddy fielding and catching on Day 2 at Headingley.#ENGvIND #TeamIndia pic.twitter.com/oI6CVm5YuU
— Circle of Cricket (@circleofcricket) June 22, 2025
या चुका भारतीय संघाला खूपच महागात पडल्या. यामध्ये ऑली पोपचा झेलही सुटला. यामुळे भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाला कडक शब्दांत सुनावले आहे. सुनील गावस्करांनी समालोचनादरम्यान टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणावर चांगली टीका केली. ते म्हणाले, “मला वाटत नाही की कोणतेही पदक दिले जाईल. जे टी. दिलीप सामन्यानंतर देतात. हे खरोखरच अत्यंत निराशाजनक होते. यशस्वी जैस्वाल एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे, पण यावेळी त्याला काहीही पकडू शकला नाही.”
टीम इंडियायाला ‘या’ तीन चुका पडल्या महागात –
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने विकेट्सच्या तीन महत्त्वाच्या संधी गमावल्या. पहिली चूक झाली ती बेन डकेटला दोनदा जीवदान मिळाल्याने; तो १५ धावांवर असताना त्याला दोनदा जीवदान देण्यात आले. दुसरीकडे, शतकवीर ऑली पोपलाही जीवदान मिळाले. तो ६० धावांवर असताना, स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या यशस्वी जैस्वालने त्याचा झेल सोडला. ज्यामुळे शतक झळकावले आणि आपल्या संघाला वनडे शैलीत फलंदाजी करत २०९ धावांचा डोंगर उभारुन दिला.





