IND vs ENG 2nd Test Shubman Gill Historic Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने मोठा धमाका केला आहे. त्याने दोन्ही धावांत जबरदस्त फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला आहे. या सामन्यात त्याने दोन्ही डावात एकूण ४३० धावा करत अनेक दिग्गजांचे विक्रम मोडत नवा इतिहास रचला आहे. तो एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारताचा पहिल्या आणि जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
शुबमन गिलने रचला इतिहास –
या सामन्यातील पहिल्या डावात शुबमन गिलने ३८७ चेंडूंचा सामना करताना ३० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात १६२चेंडूंत १३ चौकार आणि ८ षटकार ठोकत १६१ धावांची शानदार खेळी साकारली. अशा प्रकारे त्याने दोन्ही डावात एकूण ४३० धावांचा पाऊस पाडला. या धावांच्या शुबमन गिलने ऐतिहासिक कामगिरी करत एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज म्हणून विक्रम नोंदवला आहे. ज्यामुळे त्यानी अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले आणि क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
A special cricketer joins a special list! 🫡
Well done, Captain Shubman Gill! 👏 👏
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/rSuVgLLdet
— BCCI (@BCCI) July 5, 2025
शुबमन गिलचा ऐतिहासिक विक्रम –
शुबमन गिलने या कसोटी सामन्यात दोन्ही डाव मिळून ४३० धावा केल्या, ज्यामुळे तो एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला. याचबरोबर, जागतिक स्तरावर एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचे गारफिल्ड सोबर्स आहेत, ज्यांनी १९५८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध किंग्जस्टन येथे एकूण ४५६ धावा केल्या होत्या.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलचा सलग दुसऱ्या शतकासह ऐतिहासिक विक्रम; गावस्करांचा मोडला ५४ वर्षांचा रेकॉर्ड
एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारे जगातील टॉप-५ फलंदाज:
- ४५६ – ग्रॅहम गूच (इंग्लंड) विरुद्ध भारत, लॉर्ड्स, १९९०
- ४३० – शुबमन गिल (इंग्लंड) विरुद्ध इंग्लंड, एजबॅस्टन, २०२५
- ४२६ – मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध पाकिस्तान, पेशावर, १९९८
- ४२४ – कुमार संगकारा (श्रीलंका) विरुद्ध बांगलादेश, चट्टोग्राम, २०१४
- ४०० – ब्रायन लारा (विंडीज) विरुद्ध इंग्लंड, सेंट जॉन्स, २००४
हेही वाचा – IND vs ENG : बॅट हवेत उडाली, तरीही ऋषभ पंतने षटकार मारून रचला नवा इतिहास
इंग्लंडपुढे विजयासाठी ६०८ धावांचे लक्ष्य –
#TeamIndia declare at 427/6 and secure a mighty 607-run lead! 👏 👏
161 for captain Shubman Gill
69* for Ravindra Jadeja
65 for vice-captain Rishabh Pant
55 for KL RahulUpdates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ShubmanGill | @imjadeja | @RishabhPant17 | @klrahul pic.twitter.com/S7kgHbjhs2
— BCCI (@BCCI) July 5, 2025
कर्णधार शुबमन गिलच्या शतकासह केएल राहुल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ६ बाद ४२७ धावांवर डाव घोषित केला. यामुळे भारताने ६०७ धावांची आघाडी मिळवली आणि इंग्लंडपुढे विजयासाठी ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतासाठी गिलने शानदार खेळी करत १६१ धावा केल्या, तर रवींद्र जडेजा ६९ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून जोश टंग आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर ब्रायडन कार्स आणि जो रूट यांना प्रत्येकी एक विकेट्स घेतली.