IND vs ENG : भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीत मोठे बदल: दोन्ही संघांनी आपापल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केले प्रत्येकी चार बदल

IND vs ENG 5th Test Updates : भारत आणि इंग्लंड संघातील पाचव्या कसोटी सामन्याला आजपासून द ओव्हल स्टेडियमवर सुरुवात होत आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी चार बदल केल आहेत. ज्यामध्ये बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंतसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
नाणेफेकीनंतर भारताचा कर्णधार शुबमन गिलने सांगितले की, ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकुरच्या जागी करुण नायर, जसप्रीत बुमराहच्या जागी प्रसिदध कृष्णा आणि अंशुल कंबोजच्या जागी आकाश दीप यांना संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, इंग्लंडनेही आपल्या संघात चार बदल केले आहेत.
🚨 Toss and Team Update 🚨
England win the toss in the 5th Test and elect to field.
A look at #TeamIndia‘s Playing XI for the 5th and Final Test 👌👌
Updates ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#ENGvIND pic.twitter.com/fxzEfXEzLA
— BCCI (@BCCI) July 31, 2025
बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर आणि लियाम डॉसन यांना वगळण्यात आले आहे. स्टोक्सच्या जागी फिरकी अष्टपैलू खेळाडू जॅकब बेथेलला संधी देण्यात आली असून, गस ॲटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग यांनाही संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – WCL 2025 : भारताने पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनल खेळण्यास दिला नकार, दहशतवादाविरोधात ठाम भूमिका!
पाचव्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
भारत : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
हेही वाचा – IND vs ENG : ‘खेळायचे होते पण ते रिस्क नव्हती घ्यायची…’, बेन स्टोक्सने सांगितले अचानक माघार घेण्याचे कारण
इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग.





