IND vs ENG : अंशुल कंबोजचे ऐतिहासिक कसोटी पदार्पण, ३५ वर्षांची प्रतीक्षा संपली

IND vs ENG Anshul Kamboj Test debut for India : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे खेळला जाणारा चौथा कसोटी सामना अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरला आहे. या सामन्यात भारतीय संघातील युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली, ज्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर 35 वर्षांचा प्रदीर्घ प्रतीक्षा कालावधी संपुष्टात आला. विशेष म्हणजे, अंशुलला या सामन्यात आकाशदीप सिंगच्या जागी संधी देण्यात आली आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
अंशुल कंबोजने संपवली 35 वर्षांची प्रतीक्षा –
अंशुल कंबोजचे कसोटी कॅप मिळवणे केवळ त्याच्यासाठीच नव्हे, तर भारतीय क्रिकेटसाठीही एक खास क्षण आहे. यापूर्वी, 1990 मध्ये याच मँचेस्टरच्या मैदानावर भारतीय संघातील दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे याने कसोटी पदार्पण केले होते. कुंबळे यांनी पुढे जाऊन भारतीय क्रिकेटमध्ये महान फिरकीपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली. आता अंशुल कंबोज त्याच मार्गावर पाऊल ठेवत आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात करत आहे.
Test Cap number 3⃣1⃣8⃣ 🙌
Congratulations to Anshul Kamboj, who is all set to make his international Debut! 👏👏
Updates ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/ntZRqsxczF
— BCCI (@BCCI) July 23, 2025
दोन्ही खेळाडूंमध्ये आणखी एक रंजक साम्य –
याशिवाय, दोन्ही खेळाडूंमध्ये आणखी एक रंजक साम्य आहे. जिथे अनिल कुंबळे यांनी 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी करत एका डावात सर्व 10 विकेट्स घेतल्या होत्या, तिथे अंशुल कंबोजने पण 2024 मध्ये केरळविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ही दुर्मिळ कामगिरी साध्य केली होती. हा आकडा दर्शवतो की कंबोजमध्ये कुंबळे यांच्यासारखी मॅचविनर भूमिका निभावण्याची क्षमता आहे.
हेही वाचा – IND vs ENG : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल, २४ वर्षीय गोलंदाजाला मिळाली पदार्पणाची संधी
मँचेस्टर कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन) : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर





