IND vs ENG : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल, २४ वर्षीय गोलंदाजाला मिळाली पदार्पणाची संधी

IND vs ENG 4th Test England won toss : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. तसेच इंग्लंडच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत इंग्लंड अँडरसन-तेंडुलकर मालिकेत २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे.
भारतीय संघात करुण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळाली आहे. आकाश दीपच्या जागी अंशुल कंबोजला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय नितीश रेड्डींच्या जागी शार्दुल ठाकूर संघात परतला आहे. इंग्लंडच्या संघात लियाम डॉसनने खूप वर्षांनी पुनरागमन केले आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत या मालिकेतील तिन सामने झाले असून निकाल शेवटच्या दिवशी लागला.
अंशुल कंबोजचे पदार्पण –
Test Cap number 3⃣1⃣8⃣ 🙌
Congratulations to Anshul Kamboj, who is all set to make his international Debut! 👏👏
Updates ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/ntZRqsxczF
— BCCI (@BCCI) July 23, 2025
वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून पदार्पण करत आहे. दीप दासगुप्ताने त्याला कसोटी कॅप दिली. अंशुलला प्रसिध कृष्णापेक्षा प्राधान्य देण्यात आले आहे. २४ वर्षीय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या दौऱ्यासाठी यापूर्वी जाहीर झालेल्या कसोटी संघात नसलेल्या कंबोजला मँचेस्टर सामन्यापूर्वी अर्शदीप सिंग दुखापतग्रस्त झाल्यानंतर कव्हर प्लेअर म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा – Ind Vs Eng : हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये रचला इतिहास ! ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय क्रिकेटर
भारतासाठी सर्वात मोठे आव्हान –
भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण मालिकेत टिकून राहण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागेल. मँचेस्टरमधील भारताचा कसोटी रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही, त्यांनी अद्याप येथे एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. तथापि, भारतीय संघ पुनरागमन करण्यासाठी दृढ आहे आणि चांगल्या वैयक्तिक खेळीची अपेक्षा आहे. हा सामना भारत आणि इंग्लंड दोघांसाठीही कठीण आव्हान ठरेल, विशेषतः हवामानाच्या अनिश्चिततेचा विचार करता.
हेही वाचा – Ind Vs Eng : मॅनचेस्टर टेस्टआधी बेन स्टोक्सने टीम इंडियाला डिवचलं ! म्हणाला…
चौथ्या कसोटीसाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन:
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर





